परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
बातम्या
खानदेशातील प्रकल्पांत ५८ टक्के पाणी
जळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा आहे. अलीकडे काही प्रकल्पांमधून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आवर्तन सोडल्याने जलसाठा ५६ टक्क्यांवर आला आहे.
जळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा आहे. अलीकडे काही प्रकल्पांमधून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आवर्तन सोडल्याने जलसाठा ५६ टक्क्यांवर आला आहे.
अपवाद वगळता सर्वच प्रकल्प यंदाच्या जोरदार पावसात १०० टक्के भरले होते. नंदुरबारमधील दरा, सुसरी, धुळ्यातील सोनवद, मालनगाव, अमरावती, अनेर, जामखेडी, पांझरा, जळगावमधील हतनूर, गिरणा, वाघूर, सातपुडा पर्वतालगतचे सर्वच प्रकल्प १०० टक्के भरले होते. मुबलक जलसाठा असल्याने रब्बीबाबतही आशादायी स्थिती राहिली. जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा धरणातून रब्बीसाठी दोनदा आवर्तन सोडण्यात आले. धुळ्यात अनेरमधूनदेखील दोनदा आवर्तन सुटले आहे. त्यामुळे रब्बीमधील हरभरा व इतर पिकांचे सिंचन करण्यास मदत झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात रब्बीची तब्बल २०० टक्के, तर धुळ्यात १२० टक्क्यांवर पेरणी झाली आहे. कांदा लागवडही स्थिर आहे. ही लागवड खानदेशात सुमारे १७ हजार हेक्टरवर झाली आहे. अलीकडेच बाजरीची पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन सुटल्याने विविध प्रकल्पांमधील पाणीसाठा गेल्या दोन महिन्यात कमी झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात गिरणा, वाघूर प्रकल्पातील साठा ५६ टक्क्यांवर आहे. तर हतनूर प्रकल्पातील साठा ५३ टक्क्यांवर आहे. अंजनी, बहुळा प्रकल्पांमधील साठा ६० टक्के आहे. धुळ्यातही प्रकल्पांमधील साठा ६० टक्के आहे.
फारशी टंचाई नाही
खानदेशातील विविध प्रकल्पांमधील जलसाठा ६० टक्के एवढा आहे. जलसाठा यंदा मुबलक असल्याने पुढे पाणीटंचाईदेखील फारशी भासणार नाही, अशी स्थिती आहे. कारण पाणीटंचाई निवारण्यासाठी गिरणा, तापी नदीतून संबंधित प्रकल्पांमधून नदीमध्येदेखील पाणी सोडले जात आहे.
- 1 of 1546
- ››