agriculture news in Marathi 59 lac ton extra cane in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन जादा ऊस 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित अंदाजापेक्षा ५९ लाख टनाने वाढली आहे. त्यामुळे एकूण उपलब्धता ८७४ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित अंदाजापेक्षा ५९ लाख टनाने वाढली आहे.  त्यामुळे एकूण उपलब्धता ८७४ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती साखर उद्योग सूत्रांनी दिली. 

साखर आयुक्तालयाने विविध साखर कारखान्यांकडून घेतलेल्या मागोव्यानंतर ८१५ लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज गेल्या महिन्यात व्यक्त केला होता. मात्र, सुधारित अंदाजानुसार हीच ऊस उपलब्धता आता ६.७५ टक्क्यांनी जादा दिसते आहे. 
“मॉन्सून सुरू झाल्यानंतर  उसाचे लागवड क्षेत्र आम्ही पहिल्या अंदाजात १० लाख ६६ हजार हेक्टरपर्यंत गृहीत धरले होते. त्यातून गाळपासाठी ८१५ लाख टन ऊस अपेक्षित होता. याच ऊस उपलब्धतेनुसार साखर उत्पादन ९२ लाख टन अपेक्षित होती. मात्र, आता पावसामुळे सर्व गणिते बदलली आहेत,” अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दुसऱ्या अंदाजानुसार, आता राज्यातील ऊस लागवड ११ लाख ४२ हजार हेक्टरच्या पुढे गृहीत धरण्यात आली आहे. यामुळे गाळपाला किमान ८७४ लाख टन ऊस मिळू शकेल. उतारा साडेअकरा टक्के मिळाल्यास साखर उत्पादन सहजपणे ९९ लाख टनावर जाईल, असे साखर आयुक्तालयाला वाटते. 
 महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाचा ''ऊस उपलब्धता अंदाज'' मात्र आयुक्तालयापेक्षाही जादा आहे. साखर आयुक्तालयाच्या अंदाजापेक्षाही किमान २५ ते २६ लाख टन जादा ऊस राज्यात उभा आहे. ऊस भरपूर असल्याने वेळेत गाळप, जादा इथेनॉल निर्मिती आणि आर्थिक शिस्त या त्रिसूत्रीवर भर देण्याचा आग्रह आम्ही कारखान्यांना करतो आहे, असे संघाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 

प्रतिक्रिया
साखर उद्योगात सध्या ऊस उपलब्धतेविषयी विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार शेतकऱ्यांकडून यंदा किमान ९०० लाख टन ऊस कारखान्यांकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांची जबाबदारी मोठी आहे. आम्हाला गाळप नियोजनात चांगलीच कसरत करावी लागेल
- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ
 


इतर अॅग्रो विशेष
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
सोयाबीनचे ३६ लाख क्विंटल बियाणे...पुणे : राज्यातील शेतकरी बाजारातून दहा लाख क्विंटल...
काही ठिकाणी हलक्या सरी पुणे : निवार चक्रिवादळ निवळत असताना जमिनीवरून...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
सोयाबीन दरात मंदीची शक्यता नाही पुणे ः केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या...
राज्यात १०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत १४९...
शेतकरी मोर्चावर केंद्राकडून दडपशाही :...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या...
सव्वा दोन हजार कोटी रब्बीसाठी कर्जवाटप पुणे : रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना १६...
हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र पुणे:  ‘निवार’ चक्रीवादळ निवळत नाही तोच...
ऐंशी प्रकारचा प्रक्रियायुक्त कोकणमेवासिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव (ता.देवगड) येथील...
मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे अळिंबी...बेलखेड (जि. अकोला) येथील विलास व छायाताई या कुयटे...
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...