Agriculture news in Marathi 6 lakh 83 thousand farmers will be debt free in Amravati region | Agrowon

अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी होणार कर्जमुक्त

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 जानेवारी 2020

अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अमरावती विभागाला ४ हजार ७१५ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. यातून ६ लाख ८३ हजार शेतकरी कर्जमुक्त होतील, असा प्राथमिक अंदाज आहे.

अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अमरावती विभागाला ४ हजार ७१५ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. यातून ६ लाख ८३ हजार शेतकरी कर्जमुक्त होतील, असा प्राथमिक अंदाज आहे.

१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत एक किंवा त्यापेक्षा जास्त खात्यात अल्पमुदतीचे कर्ज, अल्पमुदतीच्या पीककर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन झालेले कर्ज आणि ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असलेले मुद्दल व व्याज मिळून २ लाखांपर्यंतची कर्जमुक्ती केली जाणार आहे. किमान व कमाल भूधारणेची कोणतीही अट नसलेल्या या योजनेअंतर्गत आधार कार्ड नंबर लिंक असलेल्या बॅंक खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाईल.

त्यासाठी बॅंकांकडून २ लाखांपर्यंतच्या पीककर्जाची माहिती आणि आधार लिंक खात्याची माहिती संकलित केली जात आहे. विभागात दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ६ लाख ८३ हजार ४४६ असून, त्यांच्याकडे ४ हजार ७१४ कोटी ७९ लाख ७ हजार रुपये थकीत आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या १ लाख ९६ हजार सभासदांचा समावेश आहे.विभागात ५ लाख ४८ हजार ६०८ शेतकऱ्यांचे बॅंक खाते आधार नंबरशी लिंक आहे. तर १ लाख ३४ हजार ८९२ खाते अद्याप आधार लिंक झालेले नाहीत. त्यापैकी ९० हजार बॅंक खात्यांचे आधार लिंकिंग प्रक्रियेत असून, ४४ हजार ८८९ खात्यांचे आधार लिंक अद्याप 
व्हायचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत (कर्जमाफी) सरकारने एकूण ७२ रकान्यांमध्ये माहिती मागितली होती. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत एकूण २८ रकान्यांमध्ये माहिती मागण्यात आलेली आहे. 

यात प्रामुख्याने कर्जाचा प्रकार, कर्ज वितरण दिनांक, कर्ज पुनर्गठन दिनांक, मंजूर कर्ज रक्कम, वितरित किंवा पुनर्गठित रक्कम, ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत मुद्दल, व्याज आणि ३० सप्टेंबरअखेर थकबाकी, तसेच ३० सप्टेंबरनंतर भरणा केलेल्या कर्जाची रक्कम इत्यादी 
बाबींचा समावेश आहे.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...