Agriculture news in marathi 6 months exemption from direct marketing license for fruits and vegetables | Page 2 ||| Agrowon

फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६ महिने सुट 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 एप्रिल 2021

शहरांमधील शेतीमाल पुरवठा सुरळीत राहण्यासाठी फळे भाजीपाल्याची थेट खरेदी करण्यासाठी आता ६ महिने कोणत्याही परवान्याची अट असणार नाही, असे पणन संचालनालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये आणि शहरांमधील शेतीमाल पुरवठा सुरळीत राहण्यासाठी फळे भाजीपाल्याची थेट खरेदी करण्यासाठी आता ६ महिने कोणत्याही परवान्याची अट असणार नाही, असे पणन संचालनालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. थेट पणनच्या परवान्याला ६ महिने सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

फळे, भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बांधावरील खरेदीसाठी थेट पणनचा परवाना घ्यावा लागतो. मात्र सध्याची राज्यातील कोरोना टाळेबंदीची परिस्थिती पाहता. शेतीमालाचे नुकसान होऊ नये आणि शहरातील फळे भाजीपाल्याची पुरवठा साखळी सुरळीत राहण्यासाठी खरेदीदारांना कोणत्याही परवान्याची गरज नसणार आहे. 

कोरोना टाळेबंदीत अनेक शेतकरी आणि युवकांनी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये थेट भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायावर देखील परिणाम होऊ नये यासाठी पणन संचालक सतीश सोनी यांनी थेट परवान्याची अट ६ महिन्यांसाठी शिथिल केली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यातील पाणीसाठा ४४ टक्क्यांवर पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला...
हरभरा दर पाच हजारांवर अकोला ः यंदा हरभऱ्याचा दर शासनाने जाहीर केलेल्या...
साठ कृषी कर्मचाऱ्यांचा कोरोनाने घेतला...पुणे ः कोविड १९ साथीच्या तडाख्यात सापडल्याने कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
अन्न प्रक्रियेसाठी ‘थ्री डी प्रिंटिंग’...सर्वसामान्यपणे आपल्याला विविध आकारातील कुकीज,...
मराठवाडा, विदर्भात पाऊस वाढण्याची...पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रिय वाऱ्याची...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
कापूस बियाणे विक्री एक जूनपासून पुणे ः राज्यात कापूस बियाणे विक्रीवर यंदा देखील...
कारखान्यांकडून इथेनॉलचे ३०२ कोटी  लिटर...कोल्हापूर : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल कंपन्या...
मोहफुलांवरील दारूबंदी कायद्याचे निर्बंध...पुणे ः मोहफुलांच्या प्रक्रिया उद्योगातून आदिवासी...
तुरळक ठिकाणी हलक्या सरी पुणे : पूर्वमोसमी पावसाचा काहीसा प्रभाव कमी झाला...
बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर स्थिरावले अकोला ः यंदा तुरीचे उत्पादन कमी झाले. शिवाय...
ठिकठिकाणी गारपीट, पावसाचा दणका पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात...
साखर उद्योगाकडून २५ ऑक्सिजन प्रकल्पपुणेः कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भयावह साथीचा...
गुरुवारपासून पाऊस वाढणार पुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात गेल्या...
दोन हजार कोटींचा बेदाणा शीतगृहात पडून सांगली ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सांगली-...
दर्जेदार आंब्याला मिळवले बांधावरच ग्राहकपुनर्वसित ठिकाणी मिळालेल्या शेतजमिनी ओसाड...