Agriculture news in marathi 6 small lakes in Parbhani district are dry | Agrowon

परभणी जिल्ह्यातील ६ लघु तलाव कोरडे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 मे 2020

परभणी :जिल्ह्यातील ६ लघु तलाव कोरडे पडले आहेत. या प्रकल्पांवर पाणीपुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

परभणी : जिल्ह्याच्या तापमानात झालेली वाढ, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग, बेसुमार उपसा आदी कारणांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यातील ब्रम्हवाकडी (ता.सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयामध्ये उणे (- ३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ६ लघु तलाव कोरडे पडले आहेत. या प्रकल्पांवर पाणीपुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. 

कालव्याव्दारे आवर्तन सुरु असल्यामुळे सोमवारी (ता.४) सकाळी पैठण येथील जायकवाडी धरणात ५२.३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. माजलगाव धरणात ३७.५५ टक्के, पूर्णा नदीवरील येलदरी धरणात ६९.१७ टक्के, तर सिध्देश्वर धरणात ४४.६५ टक्के, करपरा मध्यम प्रकल्पात ३० टक्के, तर मासोळी प्रकल्पात ४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. 

जिल्ह्यातील लघु तलावांमध्ये सरासरी १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यात ७ तलावांमध्ये २५ टक्केपर्यंत, ३ तलावांमध्ये ५१ ते ७५ टक्केपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. २२ पैकी १० तलावांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. त्यांपैकी ४ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. तर, ६ तलाव कोरडे पडले आहेत. जोत्याखालील तलावांत आंबेगाव, केहाळ, मांडवी, दहेगाव या तलावांचा समावेश आहे.

पेडगाव, वडाळी, जोगवाडा, चिंचोली,आडगाव, भोसी हे सहा तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्याच्या तापमानात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात घट सुरु आहे. 
 

 
 


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...