Agriculture news in Marathi 60 crore due to purchase of tur and gram in Yavatmal district | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यातील तूर, हरभरा खरेदीचे ६० कोटी थकीत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

यवतमाळ : यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तूर व हरभरा या दोन शेतमालाचे शासनाकडे तब्बल ६० कोटी रुपये थकले आहेत. मोठ्या प्रमाणात रक्कम शासनाकडे थकल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. 

यवतमाळ : यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तूर व हरभरा या दोन शेतमालाचे शासनाकडे तब्बल ६० कोटी रुपये थकले आहेत. मोठ्या प्रमाणात रक्कम शासनाकडे थकल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. असे असले तरी त्यातील केवळ चार कोटी रुपयांवर जिल्ह्याची बोळवण करण्यात आली आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने हाहाकार उडाला आहे. अशा स्थितीत बळिराजा कोरोनाच्या संकटातही दोन हात करीत आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पीककर्ज न मिळणे, शेतात पेरलेले बियाणे बोगस निघणे, पावसाचा लहरीपणा अशा अनेक संकटांचा समावेश आहे. त्यातच भर म्हणून शेतकऱ्याने विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेही अद्याप पदरी पडलेले नाहीत.

शेतमालास योग्य भाव मिळणे तर दूरच मात्र, ज्या भावात शेतमाल विक्री केला, त्या मालाचे पैसेही शेतकऱ्यांच्या हाती आलेले नाहीत. तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील ३१ हजार ७२७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी दहा हजार शेतकऱ्यांकडून जवळपास एक लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. त्यापैकी ३८ हजार क्विंटल तूर खरेदीचे २१ कोटी ७० लाख रुपये शासनाने दिले आहेत. असे असले तरी केवळ तूर खरेदीचे ४० कोटी १० लाख रुपये अद्याप अप्राप्त आहेत.

याचप्रमाणे हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या नऊ हजार ३३३ शेतकऱ्यांपैकी तीन हजार शेतकऱ्यांकडून ५५ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापैकी जवळपास सहा हजार क्विंटल हरभरा खरेदीचे दोन कोटी ७८ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. अद्याप हरभरा खरेदीचे २३ कोटी ५४ लाख रुपये शासनाकडे थकले आहेत. मे व जून या दोन महिन्यांत खरेदी करण्यात आलेला हरभरा व तूर खरेदीचे जवळपास ६४ कोटी रुपये शासनाकडे थकल्याने ही थकीत रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची प्रतीक्षाच
हरभरा व तुरीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. असे असतानाही केवळ चार कोटी रुपयेच पाठविण्यात आलेले आहेत. परिणामी, आणखी काही दिवस शेतकऱ्यांना चुकाऱ्यांसाठी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘डीएमओ’ कार्यालयाकडून रकमेसाठी पाठपुरावा सुरू आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...