सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांचे ६० कोटींचे वीजबिल थकीत

सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांचे ६० कोटींचे वीजबिल थकीत
सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांचे ६० कोटींचे वीजबिल थकीत

सांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेचे सुमारे ६० कोटी रुपयांचे वीजबिल थकले आहे. ते भरण्यासाठी महावितरण कंपनीने पाटबंधारे विभागाला नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे पुढील उन्हाळी आवर्तन सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

पावसाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे. शिवाय रब्बीचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू होती. शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू या तिन्ही योजनांची आवर्तने सुरू केली होती. गेल्या चार दिवसांपूर्वी म्हैसाळ उपास सिंचन योजना पंप दुरुस्तीसाठी आवर्तन बंद करण्यात आले. ताकारी योजना गेल्या तीन दिवसांपूर्वी सुरू केली. टेंभूचे आवर्तन कालपासून सुरू झाले. 

नुकत्याच बंद करण्यात आलेल्या आवर्तनासाठी शासन निर्णयानुसार ८१/१९ फॉर्म्युल्याप्रमाणे पाणीपट्टी वसूल करण्यात आली होती. पण शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुलीस म्हणावा तितका प्रतिसाद मिळला नाही. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत येणाऱ्या मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून केवळ २ कोटी ६० रुपये जमा झाले.

जानेवारी २०१९ अखेर या तिन्ही सिंचन योजनेकडे ५२ कोटी ३९ लाख ७५ हजार रुपये वीजबिल थकीत आहे. यामध्ये सर्वाधिक म्हैसाळ सिंचन योजनेकडे ३७ कोटी ८६ लाख ७०, टेंभूकडे ५ कोटी ८७ लाख ८५ हजार, ताकारीकडे ९ कोटी १२ लाख ८० हजार रुपये आहेत. फेब्रुवारी महिन्याचे या तिन्ही योजनांचे सुमारे ८ कोटी २५ लाख रुपये इतके वीजबिल आले आहे. त्यामुळे या तिन्ही सिंचन योजनांकडे सुमारे ६० कोटी रुपयांहून अधिक वीजबिल थकले असल्याचे सांगण्यात आले. 

वीजबिलाची थकबाकी 

टेंभू उपसा सिंचन योजना २९ कोटी ६१ लाख
ताकारी उपसा सिंचन योजना ९ कोटी ४१ लाख
म्हैसाळ उपास सिंचन योजना २३ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com