अमरावतीत बोंड अळीच्या भरपाईपोटी मिळाला ६० कोटींचा निधी

बोंड अळीच्या भरपाईपोटी मिळाला ६० कोटींचा निधी
बोंड अळीच्या भरपाईपोटी मिळाला ६० कोटींचा निधी

अमरावती : गतवर्षी गुलाबी बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानभरपाईतील मदतीचा ६० कोटी ८६ लाख १० हजार रुपयांचा तिसरा हप्ता जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे या मदतीचे वाटप शेतकऱ्यांना होणार आहे.

शासनाचे उपसचिव सु. ह. उमरीकर यांनी ७ डिसेंबर २०१७ ला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन ३३ टक्‍क्‍यांवर बाधित कपाशीचा संयुक्‍त स्वाक्षरीसह आवश्‍यक निधीचा अहवाल मागितला होता. यासाठी बाधित पिकात शेतकरी उभा असलेले जीपीएस इनबिल्ट फोटो मोबाईल ॲपच्या साह्याने काढण्यात आले. त्यानुसार २ लाख २१ हजार ४१५ शेतकऱ्यांच्या २ लाख २२ हजार ५८६ हेक्‍टर पेरणी क्षेत्रापैकी १ लाख ९९ हजार १७२ हेक्‍टरमधील कपाशी बाधित असल्याचे समोर आले.

या क्षेत्रासाठी एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे १८२ कोटी ६० लाख ३ हजार ४९३ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली. शासनाने १८२ कोटींचा मदतनिधी एकत्रित न देता तीन समान टप्प्यात देण्यात येणार असल्याचे निर्देश ८ मे २०१८ रोजी दिले. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात ६०.८७ कोटीऐवजी पहिल्या टप्प्याच्या ८० टक्‍क्‍याचे म्हणजेच ४८.७० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यास उपलब्ध केला.

त्यानंतर १५ जूनला पहिल्या टप्प्यातील बाकी रकमेसह ७३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. शुक्रवारी तिसऱ्या टप्प्यात देय असणारा निधी उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तिसऱ्या टप्प्यातील निधी त्या- त्या तालुक्‍याला वितरित केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात तो जमा करून दिवाळी गोड केली, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com