agriculture news in Marathi 60 percent posts vacant in PDKV Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे रिक्त 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याची वस्तुस्थिती असताना येथील कृषी विद्यापीठालाही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे ग्रहण लागलेले आहे. 

अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याची वस्तुस्थिती असताना येथील कृषी विद्यापीठालाही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे ग्रहण लागलेले आहे. विद्यापीठाअंतर्गत मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी सुमारे ६० टक्के पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या या पदांचा विद्यापीठाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे विदर्भातील ११ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे. पूर्व विदर्भाची पीक पद्धती वेगळी तर पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यातील वेगळी आहे. या दोन्ही भौगोलिक परिस्थितीत विद्यापीठाचा डोलारा सांभाळावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाअंतर्गत शिक्षकेत्तर पदे वगळता इतर सुमारे २६८२ पदे मंजूर आहेत. सध्या केवळ १०९१ पदे भरलेली आहेत. सुमारे १५९१ पदे रिक्त आहेत. 

विद्यापीठात अ गटाची ११ पदे मंजूर असताना केवळ तीनच पदे भरलेली आहेत. ब गटाची २७६ पदे असून ११७ रिक्त आहेत. क संवर्गातील ९६२ पदांपैकी ५४७ तर ड गटातील मंजूर १४३३ पदांपैकी तब्बल ९१९ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा अनुशेष वर्षानुवर्षे वाढत चालला आहे. सेवानिवृत्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहेत. 

विद्यापीठाच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असता. लोकप्रतिनिधी सातत्याने विद्यापीठाच्या कार्यशैली, संशोधनात्मक कामांवर बोट ठेवत असतात. काही जण ‘पांढरे हत्ती’ पोसण्याचा आरोपही करीत असतात. एकीकडे हे आरोप तर दुसरीकडे कमी कर्मचाऱ्यांमध्ये विद्यापीठाचे कामकाज चालविण्याचे ‘दिव्य’ पार पाडले जात आहे. विद्यापीठातील पदे भरण्यासाठी प्रत्येक सरकारने आश्‍वासने दिली. घोषणाही केल्या. प्रत्यक्षात मात्र हे काम झालेले आहे. अनेक जण नोकरभरतीसाठी प्रतिक्षा करीत आहेत. 

कार्यकारी परिषद सदस्य आमदारांकडून अपेक्षा 
विद्यापीठाअंतर्गत सुमारे ६० टक्के पदे रिक्त असल्याने संशोधन, विस्तार, शैक्षणिक कामकाज प्रभावित झालेले आहे. रिक्त पदांमुळे प्रभारी अधिकाऱ्यांवर कामकाज सांभाळण्याची वेळ आलेली आहे. विद्यापीठात रिक्त असलेली पदे भरून घेण्यासाठी जिल्ह्यातील, विदर्भातील लोकप्रतिनिधींकडून आवाज उठविण्याची गरज आहे. सध्या या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सत्तारूढ महाविकास आघाडीतील शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरीया, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे कार्यरत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी आमदारांची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. विदर्भातील महत्त्वाच्या व डॉ. पंजाबराव देशमुखांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठातील रिक्त पदे भरून घेण्याची जबाबदारी आमदारांनी घेण्याची गरज आहे. 


इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...