agriculture news in marathi, 60 thousand cusecs of Daund in Ujani dam | Agrowon

उजनी धरणात दौंडचा विसर्ग ६० हजार क्‍युसेक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018
सोलापूर : उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून सोडलेले पाणी येऊन मिसळत असल्याने धरणाची वाटचाल ८० टक्‍क्‍यांच्या दिशेने सुरू झाली आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजेपासून धरणात दौंड येथून ६० हजार १६५ क्‍युसेकने पाणी मिसळत आहे. त्यामुळे सायंकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ७३.७८ टक्के इतका झाला आहे.
 
सोलापूर : उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून सोडलेले पाणी येऊन मिसळत असल्याने धरणाची वाटचाल ८० टक्‍क्‍यांच्या दिशेने सुरू झाली आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजेपासून धरणात दौंड येथून ६० हजार १६५ क्‍युसेकने पाणी मिसळत आहे. त्यामुळे सायंकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ७३.७८ टक्के इतका झाला आहे.
 
पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे त्या धरणातून खाली पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा १०१.१८ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा ३९.५३ टीएमसी इतका झाला आहे. बंडगार्डन येथून ३६ हजार १७८ क्‍युसेकचा विसर्ग येत आहे. सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसला तरी पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उजनी लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

चंद्रभागेची पातळी वाढल्याने पुंडलिक मंदिर पाण्यात
वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. श्री पुंडलिक मंदिरासह लगतच्या मंदिरांना पाण्याने वेढले आहे. मंगळवारी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीमुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रेप्रमाणे गर्दी झाली. एवढी गर्दी होईल असा प्रशासनास अंदाज न आल्याने नियोजनाचा अभाव दिसून आला.

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.  पुत्रदा एकादशीची पर्वणी साधण्यासाठी तीन लाखांहून अधिक भाविक आलेले आहेत. चंद्रभागेत स्नानासाठी देखील पहाटेपासून गर्दी होती. परंतु प्रशासनाने योग्य नियोजन केलेले दिसत नाही. अनेक रस्त्यांवर जागोजागी विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली असून फेरीवाल्यांची गर्दी असते. वाहने रस्त्यांवर ठिकठिकाणी उभा करण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आदी भागांत भाविकांना चालणे मुश्‍कील झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...