निम्म दुधना प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा

ब्रम्हवाकडी (ता. सेलू) येथील निम्म दुधना प्रकल्पाच्या धरणांमध्ये रविवारी (ता. २३) सकाळी १४६.६८४ एमएमक्युब (६०.५६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे येत्या रब्बी हंगामात या धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्याव्दारे पाणी आवर्तने मिळण्याची खात्री झाली आहे.
60% water storage in Nimma Dudhna project
60% water storage in Nimma Dudhna project

परभणी ः ब्रम्हवाकडी (ता. सेलू) येथील निम्म दुधना प्रकल्पाच्या धरणांमध्ये रविवारी (ता. २३) सकाळी १४६.६८४ एमएमक्युब (६०.५६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे येत्या रब्बी हंगामात या धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्याव्दारे पाणी आवर्तने मिळण्याची खात्री झाली आहे.

निम्म दुधना धरणामध्ये यंदाच्या पावसासाळ्यात आजवर १७५.३७० एमएमक्युब पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे प्रकल्पात एकूण २४९.२८४ एमएमक्युब एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला. रविवारी  (ता. २३) येलदरी धरणामध्ये ८०१.०२३ एमएमक्युब (९८.९१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा आजवर ८१०.३३८ एमएमक्युब पाण्याची आवक झाली. खडकपूर्णा धरणातील विसर्गामुळे आवक वाढल्यामुळे धरणाचे १ आणि १० क्रमांकाचे दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून ४२१९.७३ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता.

गेल्या २४ तासांमध्ये एकूण २५.९६८७ एमएमक्युब आणि आजवर एकूण ३७३.८२२ एमएमएक्युब पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जलविद्युत केंद्राव्दारे एकूण ४.८४२ एमकेडब्लूएच वीज निर्मिती करण्यात आली. सिद्धेश्वर धरणामध्ये ७८.५१३ एमएमक्युब (९६.९७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. माजलगाव धरणामध्ये एकूण ३६८.५० एमएमक्युब तर उपयुक्त २२६.५० एमएमक्युब (७२.६० टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता.

इसापूर येथील उर्ध्वपैनगंगा धरणामध्ये ८३९.००९ एमएमक्युब (८७.०२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पांमध्ये १६७५३.८३ (७७.१७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ८१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com