खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६०० झाडे जळाली

सिंधुदुर्गः जिल्ह्यातील खांबाळे (ता. वैभववाडी) व पडवणे (ता. देवगड) येथील माळरानाला लागलेल्या आगीत ६०० हुन अधिक आंबा, काजूची झाडे जळाली.
600 mango and cashew trees at Khambale, Padwane were burnt
600 mango and cashew trees at Khambale, Padwane were burnt

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता. वैभववाडी) व पडवणे (ता. देवगड) येथील माळरानाला लागलेल्या आगीत ६०० हुन अधिक आंबा, काजूची झाडे जळाली. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील खांबाळे येथील माळरानाला बुधवारी (ता.२) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. संपूर्ण माळरानावर सुकलेले गवत असल्यामुळे आगीचा भडका उडाला. ही आग सूर्याजी भिकाजी पवार यांच्या काजू बागेत घुसली. तेथे काहींनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात आली नाही. आगीत पवार यांची दीडशेहून अधिक काजूची कलमे भस्मसात झाली. काही अंतरावर असलेल्या मनोज मधुकर पवार यांच्या बागेला देखील आगीने वेढले. स्थानिक शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरीदेखील त्यांची ६० हुन अधिक झाडे आगीत जळाली. 

दरम्यान, गावातील शेकडो तरुण माळरानावर आले. त्यांनी पाणी आणि झाडाच्या फांद्याचा वापर करून आग आटोक्यात आणली. दीड दोन तासानंतर आग विझविण्यात ग्रामस्थांना यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, देवगड तालुक्यातील पडवणे गावातील माळरानाला अचानक आग लागली. हे समजताच सर्व बागायतदार आपापल्या बागेच्या दिशेने पळत सुटले. माळरानावर आंब्याच्या मोठ्या बागा असल्यामुळे बागायतदार हैराण झाले होते. अखेर तास दोन तासानंतर स्थानिकांनी आग विझविली. तासाभरानंतर पुन्हा या माळरानाला आग लागली. ती देखील स्थानिक ग्रामस्थांनी विझविली. यात ४०० हुन अधिक आंबा झाडांचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com