Agriculture news in Marathi 6,000 farmers registered for sale of tur in Parbhani | Agrowon

परभणीत तूर विक्रीसाठी ६ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जानेवारी 2021

आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी शुक्रवार (ता. २२) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ९ केंद्रांवर ३ हजार ९१३ आणि हिंगोली जिल्ह्यातील ६ केंद्रांवर २ हजार ४८३ शेतकऱ्यांनी असे दोन जिल्ह्या़ंतील मिळून ६ हजार ३९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

परभणी ः आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी शुक्रवार (ता. २२) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ९ केंद्रांवर ३ हजार ९१३ आणि हिंगोली जिल्ह्यातील ६ केंद्रांवर २ हजार ४८३ शेतकऱ्यांनी असे दोन जिल्ह्या़ंतील मिळून ६ हजार ३९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील तुरीचे दर ६ हजार रुपयांवर गेले आहेत. परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तूर दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शासकीय तूर खरेदीसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे. परंतु तूर्त या दोन जिल्ह्यांत तूर खरेदी सुरू झालेली नाही.

राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा  या ७ ठिकाणी आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या ६ ठिकाणी केंद्रांवर शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी ४ हजार ८८८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, असे जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी सांगितले. विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील मानवत येथील केंद्रांवर एकूण १ हजार ६३० शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी ५९८ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. गंगाखेड येथील केंद्रावर २ हजार १९७ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी ९१० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६१०० ते ६१६० रुपये दर मिळत आहे. सध्या या दोन जिल्ह्यांमध्ये तूर काढणीची कामे सुरू आहेत. नवीन तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे. अजून शासकीय तूर खरेदीस सुरुवात झालेली नाही. परंतु खुल्या बाजारातील दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...