नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
ताज्या घडामोडी
परभणीत तूर विक्रीसाठी ६ हजार शेतकऱ्यांची नोंदणी
आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी शुक्रवार (ता. २२) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ९ केंद्रांवर ३ हजार ९१३ आणि हिंगोली जिल्ह्यातील ६ केंद्रांवर २ हजार ४८३ शेतकऱ्यांनी असे दोन जिल्ह्या़ंतील मिळून ६ हजार ३९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
परभणी ः आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी शुक्रवार (ता. २२) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ९ केंद्रांवर ३ हजार ९१३ आणि हिंगोली जिल्ह्यातील ६ केंद्रांवर २ हजार ४८३ शेतकऱ्यांनी असे दोन जिल्ह्या़ंतील मिळून ६ हजार ३९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील तुरीचे दर ६ हजार रुपयांवर गेले आहेत. परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तूर दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शासकीय तूर खरेदीसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. परंतु तूर्त या दोन जिल्ह्यांत तूर खरेदी सुरू झालेली नाही.
राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ७ ठिकाणी आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या ६ ठिकाणी केंद्रांवर शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी ४ हजार ८८८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, असे जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी सांगितले. विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील मानवत येथील केंद्रांवर एकूण १ हजार ६३० शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी ५९८ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. गंगाखेड येथील केंद्रावर २ हजार १९७ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी ९१० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६१०० ते ६१६० रुपये दर मिळत आहे. सध्या या दोन जिल्ह्यांमध्ये तूर काढणीची कामे सुरू आहेत. नवीन तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे. अजून शासकीय तूर खरेदीस सुरुवात झालेली नाही. परंतु खुल्या बाजारातील दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.