शेतकऱ्यांच्या खात्यात ६१ कोटी रुपये जमा ः मदन भोसले

शेतकऱ्यांच्या खात्यात ६१ कोटी रुपये जमा ः मदन भोसले
शेतकऱ्यांच्या खात्यात ६१ कोटी रुपये जमा ः मदन भोसले

सातारा : ‘‘किसन वीर उद्योगसमूहातील किसन वीर, खंडाळा साखर उद्योग, प्रतापगड साखर उद्योग या तिन्ही कारखान्यांत यंदाच्या वर्षी गाळपास आलेल्या उसाच्या एफआरपी रकमेपोटी ६१ कोटी ४२ लाख ८१ हजार रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे,’’ अशी माहिती किसन वीर उद्योगसमूहाचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली. 

पत्रकात भोसले यांनी म्हटले आहे, की अनेक अडचणी असतानाही यंदाच्या हंगामात किसन वीर उद्योगसमूहातील तिन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात किसन वीर उद्योगसमूहाच्या व्यवस्थापनाला यश आले. शेतकरी सभासदांच्या विश्‍वासाला प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करताना कसलीही तडजोड केली जाणार नाही. सध्या एका कारखान्याचे तीन कारखाने झाले. दोन सहवीज निर्मिती प्रकल्प झाले. एका डिस्टिलरीच्या तीन डिस्टिलरी झाल्या. इथेनॉल प्रकल्प, सीएनजी प्रकल्प उभे राहिले, असे उभे राहिलेले प्रकल्प कितीतरी आहेत. 

उसाच्या एफआरपीपोटी ६१ कोटी ४२ लाख ८१ हजार रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. त्यात खंडाळा साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात १९ कोटी १७ लाख ४८ हजार रुपये, प्रतापगड साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात सात कोटी ४६ लाख ५३ हजार रुपये आणि किसन वीर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ३४ कोटी ७८ लाख ८० हजार रुपये एवढी रक्कम जमा केली आहे. 

खंडाळा कारखान्याची एफआरपी २५८७ रुपये ७२ पैसे एवढी असून, त्या रकमेची ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत गाळपास आलेल्या उसाची ८६ टक्के रक्कम जमा केली आहे. प्रतापगड कारखान्याची एफआरपी २५०६ रुपये ६९ पैसे असून, त्यापोटी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत गाळपास आलेल्या उसाची ८९ टक्के रक्कम जमा केली आहे. किसन वीर कारखान्याची एफआरपी रक्कम २६५४ रुपये ४३ पैसे एवढी असून, त्यापोटी १५ डिसेंबर २०१८ पर्यंत गाळपास आलेल्या उसाची ८३ टक्के रक्कम जमा केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com