agriculture news in Marathi 614 crore of cotton payment dues Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कापसाचे ६१४ कोटी थकीत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची एकूण किंमत ४९३६ कोटी रुपये आहे. त्यापैकी ४३२१ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले तर ६१४ कोटींचे चुकारे शिल्लक आहेत.

नागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची एकूण किंमत ४९३६ कोटी रुपये आहे. त्यापैकी ४३२१ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले तर ६१४ कोटींचे चुकारे शिल्लक आहेत. तसेच विदर्भ, परभणी आणि जळगाव या तीन विभागात शिल्लक कापसाची खरेदी या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली.

बाजारात कापसाचे दर पाच हजार ५५० रुपये या हमीभावापेक्षा कमी होते. परिणामी शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’ तसेच कापूस पणन महासंघाला आपला कापूस विकला. त्यामुळे राज्यात यावर्षी विक्रमी ९२ लाख २७ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. ‘‘राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची एकूण किंमत ४९३६ कोटी रुपये आहे. त्यापैकी ४३२१ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत.

सद्यःस्थितीत ६१४ कोटी रुपयांचे चुकारे शिल्लक असून त्याकरिता लवकरच निधीची तरतूद केली जाणार आहे. साधारणतः या आठवड्याच्या अखेरीस सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस खरेदीची रक्कम जमा होईल,’’ अशी माहितीही श्री. देशमुख यांनी दिली.  

प्रतिक्रिया
राज्यात यावर्षी ९२ लाख २७ हजार क्विंटल इतक्या विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली आहे. मनुष्यबळ कमी असतानाही पणन महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देत ही खरेदी केली. सद्यःस्थितीत ६१४ कोटी रुपयांचे चुकारे थकीत असून या आठवड्यात त्याकरता तरतूद करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.
— अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.


इतर अॅग्रो विशेष
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...