अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ६१.५० कोटींचा निधी

अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ६१.५० कोटींचा निधी
अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ६१.५० कोटींचा निधी

अकाेला : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. या निधीचे लवकरच वितरण केले जाणार आहे.

दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी जिल्ह्याला १९९ कोटी ११ लाख रुपये मदत जाहीर झाली होती. यापैकी सुरुवातीला १३७ कोटी ६१ लाख २४ हजार ५६० रुपये जिल्हा प्रशासनाला मिळाले आहेत. राहलेला टप्पा जवळपास आठ महिन्यानंतर मंजुर केला आहे.

मागील हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे पाच तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली होती. या तालुक्यांना दुष्काळी मदत सुद्धा जाहीर केली होती. त्यापैकी पहिला, दुसरा आणि तिसऱ्या टप्प्‍याचे १३७ कोटी ६१ लाख २४ हजार ५६० रुपये जिल्हा प्रशासनाला यापूर्वीच मिळाले. हा निधी पाच तालुक्यांतील दोन लाख १७ हजार ८६१ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आला.

या तालुक्यातील काही शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती. शेतकऱ्यांचे ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपये रखडले होते. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी हा निधी उपलब्ध करुन दिला. जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा व बार्शीटाकळी या पाच तालुक्यांत पहिल्या टप्‍यात शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने १९९ कोटी ११ लाख रुपयांच्या मदतीची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी १३७ कोटी ६१ लाख २४ हजार रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाला यापूर्वीच मिळाली.

शासनाने नंतरच्या टप्प्‍यात पातूर व अकोट तालुक्यातही दुष्काळ जाहीर केला. मात्र या तालुक्यांतील शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नसल्याने शेतकरी सातत्याने शासनाकडे मागणी करीत आहेत. या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ८२ कोटी रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केल्याचे सांगितले जाते. 

दुष्काळी मदतनिधी स्थिती (रूपयांत)

जाहीर निधी १९९ कोटी ११ लाख 
पहिला टप्पा ४० कोटी ७७ लाख ७७ हजार २८०
दुसरा टप्पा ४० कोटी ७७ लाख ७७ हजार २८०
तिसरा टप्पा ५६ कोटी ५ लाख ७० हजार
चौथा टप्पा ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार
दोन तालुक्यांसाठी मागणी ८२ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com