61st Convention of Grape Growers Association from today
61st Convention of Grape Growers Association from today

द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे अधिवेशन

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ६१ वे वार्षिक अधिवेशन बुधवार (ता. २२) पासून सुरू होत आहे. २२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत ते होणार असल्याची माहिती संघाचे कोशाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.

नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ६१ वे वार्षिक अधिवेशन बुधवार (ता. २२) पासून सुरू होत आहे. २२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत ते होणार असल्याची माहिती संघाचे कोशाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली. 

बुधवारी सकाळी ९ वाजता उद्‌घाटन समारंभ पार पडणार आहे. उद्‌घाटनप्रसंगी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, कृषिमंत्री दादा भुसे, कृषी आयुक्त धीरजकुमार आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. पाच दिवसांच्या अधिवेशनात तांत्रिक चर्चासत्रामध्ये राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक व शास्त्रज्ञ, राज्यातील द्राक्ष तज्ज्ञ व परदेशातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

बुधवारी सकाळी १० ते १०.४५ दरम्यान ‘सध्याच्या परिस्थितीतील द्राक्ष बागेतील समस्या व उपाययोजना’ विषयावर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुवर हे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी १०.४५ ते ११.३० दरम्यान ‘द्राक्ष बागेत अन्नद्रव्य व पाण्याचे व्यवस्थापन-रणनीती’ या विषयावर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे मृदाशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. उपाध्याय मार्गदर्शन करतील. तर सायंकाळी ६ ते ७.१५ दरम्यान ‘द्राक्ष गुणवत्तेसाठी नवीन बायोस्टिम्युलेटचे महत्त्व व योग्य वापर’ या विषयावर स्पेन येथील ट्रेडकार्पचे डॉ. लायडिया युगेना मार्गदर्शन करणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com