Agriculture news in Marathi 62,000 HTBT stocks seized in Gondhali Shivara | Agrowon

गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी साठा जप्त

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 जून 2020

यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ सीमेवरील एका शेतातील घरातून अनधिकृत एचटीबीटीचा ८५ पाकिटांचा साठा जप्त केला. या कारवाईत जप्त बियाण्यांची किंमत ६२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अमरावती विभागातील ही पहिलीच छापेमारी ठरली आहे.

यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ सीमेवरील एका शेतातील घरातून अनधिकृत एचटीबीटीचा ८५ पाकिटांचा साठा जप्त केला. या कारवाईत जप्त बियाण्यांची किंमत ६२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अमरावती विभागातील ही पहिलीच छापेमारी ठरली आहे.

हरियाणातून हंगामात मळणीकामी येणाऱ्या काहींनी यवतमाळच्या किन्ही गोंधळी भागात शेती खरेदी केली आहे. त्याच शिवारात त्यांनी घर बांधत कुटुंबासह ते राहत देखील आहेत. मळणी यंत्र हंगामात ते भाडेतत्वावर देतात. त्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत त्यांच्याव्दारे आता अनधिकृत एचटीबीटी विकल्या जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीची शहनिशा करण्यासाठी पहिल्या दिवशी डमी ग्राहक पाठवून दहा पाकिटांची खरेदी करण्यात आली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पुन्हा सात पाकिटे खरेदी करुन कृषी विभागाने खात्री केली. त्यानंतर छापेमारी करीत ६२ हजार रुपये किंमतीची ८५ पाकिटे जप्त करण्यात आली.  घारफड, धामणगाव, चांदूररेल्वे, बाभूळगाव, देवळी (वर्धा) या भागातही सदर व्यक्‍तीने अनधिकृत बियाणे विकल्याची शक्‍यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

यवतमाळ जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पंकज बरडे, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी नरेंद्र बारापात्रे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत मस्करे, दत्तात्रय आवारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी बिजेंद्र ईश्‍वर दांगी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.


इतर बातम्या
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात कृषी...औरंगाबाद : मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
परभणी, नांदेड, हिंगोलीत निविष्ठा...परभणी : कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विविध...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...