लॉकडाउन शिथिलतेनंतर विदर्भात केळी दर स्थिर

नागपूर ः लॉकडाउनपूर्वी ३०० ते ३७५ रुपये असा दर असलेल्या केळीच्या दरात बऱ्याच अंशी सुधारणा होत हे दर ६०० ते ६५० रुपये क्‍विंटलवर पोचले होते. सध्या केळीचे दर स्थिर असून १५ किलो व त्यावरील घडाकरिता हे दर मिळत आहेत.
Banana prices stabilize in Vidarbha after lockdown
Banana prices stabilize in Vidarbha after lockdown

नागपूर ः लॉकडाउनपूर्वी ३०० ते ३७५ रुपये असा दर असलेल्या केळीच्या दरात बऱ्याच अंशी सुधारणा होत हे दर ६०० ते ६५० रुपये क्‍विंटलवर पोचले होते. सध्या केळीचे दर स्थिर असून १५ किलो व त्यावरील घडाकरिता हे दर मिळत आहेत. नांदेड, रावेर भागांतील माल सध्या विदर्भात येत असल्याची माहिती केळी व्यापाऱ्यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसूर्जी तालुका केळीचे हब म्हणून नावारूपास आले आहे. जळगाव व अंजनगावचेच दर राज्यभरात मानले जातात. याच भागात रायपनिंग चेंबरची संख्याही यामुळे वाढीस लागली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्यांतील पांढरकवडा भागात केळी होते. अकोट व लगतच्या भागात दहा रायपनिंग चेंबर आहेत. हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल या भागात होते. मात्र, कोरोना लॉकडाउनमुळे व्यापारी बागांकडेच फिरकले नसल्याने केळी उत्पादकांची चिंता वाढीस लागली होती. दरही ३०० ते ३७५ रुपयांवर पोचले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळत गेल्याने दरात सुधारणा झाली.

व्यवस्थापनावर ६० हजारांचा खर्च प्रती हजारी झाडांवर ६० ते ७५ हजार रुपयांचा खर्च व्यवस्थापनावर होतो. गेल्यावर्षी जून, जुलै मध्ये नव्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची केळी काढणीस आली आहे. खोडवा घेणाऱ्या शेतकऱ्यांची केळी लॉकडाउनपूर्वीच काढणीस आली होती. परिणामी, या शेतकऱ्यांना चांगले दर मिळाले. लॉकडाउननंतर काढणीस आलेल्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले, असे शेतकरी सांगतात.

नांदेड, रावेर तसेच पणज या भागांतून सध्या मालाची आवक होत आहे. विदर्भात एप्रिल, मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक राहते. त्यामुळे केळी बागेला पाणी अधिक लागत असल्याने शेतकरी मे महिन्याच्या सुरुवातीलाच पीक निघावे अशा पद्धतीने नियोजन करतात. त्याकरिता जून महिन्यात लागवड करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केळीची तोडणी होते. पणज परिसरात ६५ ते ७० हजार रोपांची लागवड झाली आहे. गेल्यावर्षीपर्यंत १४ रुपये ५० पैसे असा रोपांचा दर होता. यावर्षी दर पंधरा रुपयांवर पोचले आहेत. औरंगाबाद, जळगाव, पुणे या भागांतून रोपांचा पुरवठा होतो. यावर्षी पाण्याची स्थिती चांगली असल्याने विदर्भात केळी लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज आहे. - हर्षल अकोटकर, केळी उत्पादक शेतकरी, पणज, अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com