हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद खरेदी 

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये शनिवारी (ता. ४) ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) अंतर्गत ६२२ क्विंटल हळद खरेदी करण्यात आली.
turmeric
turmeric

हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये शनिवारी (ता. ४) ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) अंतर्गत ६२२ क्विंटल हळद खरेदी करण्यात आली. हळदीला प्रतिक्विंटल ४८०० ते ५९९९ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  ई-नामअंतर्गत पहिल्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाला. वसमत बाजार समितीत ऑगस्ट २०१७ पासून ई-नामची अंमलबजावणी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये सेनगाव आणि हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समित्यांची ई-नाममध्ये निवड झाली. यंदाच्या ८ जून पासून सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नामअंतर्गत हळद खरेदीस सुरुवात झाली. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.४) ई-नाम अंतर्गत हळद खरेदीस प्रारंभ जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सुधीर मेत्रेवार यांच्या हस्ते करण्यात आला.  या वेळी समितीचे सभापती हरिश्‍चंद्र शिंदे, उपसभापती शंकरराव पाटील, सहायक निबंधक राठोड, संचालक उत्तमराव वाबळे, प्रशांत सोनी, दत्तराव जाधव, प्रभाकर शेळके, किसनराव नेव्हल, नारायण वैद्य, राजेश पाटील, रामेश्वर शिंदे, राजीव वडकुते, संजय कावरखे, शेख बुऱ्हाण, जिजाबाई शिंदे, लिंबाजी मुटकुळे, बबनराव सावंत, बाबाराव बांगर, गुलाबराव सरकटे, बाजार समितीचे सचिव नारायण पाटील, सेनगाव बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ, खरेदीदार ज्ञानेश्वर मामडे, नवीनचंद्र सोनी, शिवचरण भक्कड, देविकांत देशमुख, इद्रिस अहमद, शिवाजी काबर, सतीश जराड, निशांत दोडल आदी उपस्थित होते.  या वेळी पहिल्या पाच शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पहिल्या दिवशी आवक झालेल्या हळदीचे एकूण ६५ लॉट पाडण्यात आले. कमीत कमी चार खरेदीदारांनी तर जास्तीत जास्त ११ खरेदीदारांनी एका लॉटसाठी ई-बोली लावली. एकूण ६२२ क्विंटल हळदीची खरेदी करण्यात आली. हळदीला प्रतिक्विंटल ४८०० ते ५९९९ रुपये दर मिळाले. एकूण ३१ लाख रुपये किमतीची हळद खरेदी करण्यात आली.  हिंगोली जिल्ह्यातील तीनही बाजार समित्यांमध्ये जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या हळदीची ई-नामअंतर्गत खरेदी केली जात आहे. येत्या काळात रोखीचे व्यवहार बंद करून ई-पेमेंट पद्धतीने शेतकऱ्यांना रक्कम देण्याची अंमलबजावणी केली जाईल.  - सुधीर मेत्रेवार, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), हिंगोली 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com