agriculture news in Marathi 622 turmeric procured under e-nam Maharashtra | Agrowon

हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद खरेदी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 जुलै 2020

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये शनिवारी (ता. ४) ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) अंतर्गत ६२२ क्विंटल हळद खरेदी करण्यात आली.

हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये शनिवारी (ता. ४) ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) अंतर्गत ६२२ क्विंटल हळद खरेदी करण्यात आली. हळदीला प्रतिक्विंटल ४८०० ते ५९९९ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

ई-नामअंतर्गत पहिल्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाला. वसमत बाजार समितीत ऑगस्ट २०१७ पासून ई-नामची अंमलबजावणी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये सेनगाव आणि हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समित्यांची ई-नाममध्ये निवड झाली. यंदाच्या ८ जून पासून सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नामअंतर्गत हळद खरेदीस सुरुवात झाली. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.४) ई-नाम अंतर्गत हळद खरेदीस प्रारंभ जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सुधीर मेत्रेवार यांच्या हस्ते करण्यात आला. 

या वेळी समितीचे सभापती हरिश्‍चंद्र शिंदे, उपसभापती शंकरराव पाटील, सहायक निबंधक राठोड, संचालक उत्तमराव वाबळे, प्रशांत सोनी, दत्तराव जाधव, प्रभाकर शेळके, किसनराव नेव्हल, नारायण वैद्य, राजेश पाटील, रामेश्वर शिंदे, राजीव वडकुते, संजय कावरखे, शेख बुऱ्हाण, जिजाबाई शिंदे, लिंबाजी मुटकुळे, बबनराव सावंत, बाबाराव बांगर, गुलाबराव सरकटे, बाजार समितीचे सचिव नारायण पाटील, सेनगाव बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ, खरेदीदार ज्ञानेश्वर मामडे, नवीनचंद्र सोनी, शिवचरण भक्कड, देविकांत देशमुख, इद्रिस अहमद, शिवाजी काबर, सतीश जराड, निशांत दोडल आदी उपस्थित होते. 

या वेळी पहिल्या पाच शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पहिल्या दिवशी आवक झालेल्या हळदीचे एकूण ६५ लॉट पाडण्यात आले. कमीत कमी चार खरेदीदारांनी तर जास्तीत जास्त ११ खरेदीदारांनी एका लॉटसाठी ई-बोली लावली. एकूण ६२२ क्विंटल हळदीची खरेदी करण्यात आली. हळदीला प्रतिक्विंटल ४८०० ते ५९९९ रुपये दर मिळाले. एकूण ३१ लाख रुपये किमतीची हळद खरेदी करण्यात आली. 

हिंगोली जिल्ह्यातील तीनही बाजार समित्यांमध्ये जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या हळदीची ई-नामअंतर्गत खरेदी केली जात आहे. येत्या काळात रोखीचे व्यवहार बंद करून ई-पेमेंट पद्धतीने शेतकऱ्यांना रक्कम देण्याची अंमलबजावणी केली जाईल. 
- सुधीर मेत्रेवार, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), हिंगोली 


इतर अॅग्रोमनी
कृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणारनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत...
साखरेच्या निर्यात योजनेत लवचिकताकोल्हापूर : यंदा साखर जास्तीत जास्त निर्यात...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सोयाबीन... पुणे ः प्रतिकूल हवामानामुळे  ...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
आधारभावाअभावी मक्याची परवडचालू हंगामासाठी केंद्र सरकारने मक्याला १८५० रुपये...
अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात घटवॉशिंग्टन ः अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादनात घटीचा...
जागतिक मका उत्पादनात घट वॉशिंग्टन ः जागतिक मका उत्पादनात घट होणार...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
दराचे संरक्षण देणाऱ्या योजना राबवाव्यात पुणे ः ‘एनसीडीईएक्स’ने ‘पुट ऑप्शन’मधून शेतकरी...
‘बासमती’ची तांदळाचा तुटवडाकोल्हापूर: गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या...
सोयाबीन बाजारात तेजीचेच संकेतपुणे ः शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ८० टक्के सोयाबीन...
तांदळाच्या विक्रमी निर्यातीची यंदा शक्‍...कोल्हापूर : देशात यंदा भाताचे चांगले उत्पादन...
कापसाच्या दरात सुधाराची चिन्हेपुणे ः ‘सीसीआयने’ कापसाला हमीभावापेक्षा  ३००...
केंद्रीय अर्थसंकल्पातून होणार सवलतींची...नवी दिल्ली ः कोरोनाच्या संसर्गामुळे...
मालविक्रीसाठी ३५ शेतकरी कंपन्या एकाच...शेतकऱ्यांना ‘शेतीमाल पिकवता येतो, मात्र विकता येत...
हंगामाच्या प्रारंभीच कोलम, आंबेमोहोर...कोल्हापूर: देशातील तांदळाचा हंगाम सुरु झाला आहे....
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ...कोल्हापूर : राज्य सहकारी साखर कारखाना...
सुताच्या दरात मोठी वाढजळगाव ः जगभरातील प्रमुख आयातदारांकडून सुताची मोठी...