भंडाऱ्यातील ६३ प्रकल्प गाठत आहेत तळ

भंडारा पाटबंधारे विभाग अंतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांतील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. प्रकल्पांमध्येच ३३.०४ टक्केच जलसाठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भंडाऱ्यातील ६३ प्रकल्प गाठत आहेत तळ 63 projects in Bhandara are approaching the bottom
भंडाऱ्यातील ६३ प्रकल्प गाठत आहेत तळ 63 projects in Bhandara are approaching the bottom

भंडारा : सरासरी बरसलेला मॉन्सून, त्यानंतर अवकाळी पावसाची संततधार, परतीचा पाऊस या सर्व कारणांमुळे जिल्ह्यात भूजल पातळीत वाढ झाली होती. प्रकल्पही तुडुंब भरले होते. आता मात्र पाटबंधारे विभाग अंतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांतील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. प्रकल्पांमध्येच ३३.०४ टक्केच जलसाठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात चार लघू प्रकल्प आहेत. त्यामध्ये ३६ टक्के जलसाठा असून, चांदपुर प्रकल्पात ४४.२७ टक्के, बघेडा २८.३५, बेटेकर बोथली २९.४० आणि सोरना प्रकल्पात  ९.५० टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पात १५.६९४ दलघमी उपयुक्त साठा असून, १.५३ दलघमी मृत साठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पांची क्षमता ५३.५४१ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात १७.२८६ दलघमी उपयुक्त साठा असून ४.२४८ दलघमी मृत साठा आहे.

तुमसर तालुक्यातील कवलेवाडा, भंडारा तालुक्यातील आमगाव,  सिल्ली, अंबाडी, पवनी तालुक्यातील वाडी, भिवाखिडकी या प्रकल्पांमध्ये तूर्तास पन्नास टक्केपेक्षा अधिक जलसाठा आहे. जिल्ह्यात माजी मालगुजारी अर्थात मामा तलावांची संख्या अठ्ठावीस आहे. या प्रकल्पांची साठवण क्षमता २५.४०४ दलघमी असून, सध्या या प्रकल्पात केवळ सात दलघमी जलसाठा आहे. प्रत्येक गावात मामा तलाव असले तरी २८ तलाव जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहेत या तलावांची अवस्था बिकट झाली आहे.

 गाळामुळे पाणी लवकर संपले भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, अतिवृष्टी आणि महापूर शेतकऱ्यांनी अनुभवला. आता मात्र जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला आहे. प्रकल्पांमध्ये साचलेला गाळ हे प्रकल्प कोरडे पडण्यामागील एक महत्त्वाचे कारण असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यासोबतच सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने जलसाठा कमी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com