राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६३५ला पोचली; ५२ रुग्णांना डिचार्ज

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ६३५ झाली आहे. आतापर्यंत ५२ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (ता.४) दिली.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६३५ला पोचली; ५२ रुग्णांना डिचार्ज
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६३५ला पोचली; ५२ रुग्णांना डिचार्ज

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ६३५ झाली आहे. आतापर्यंत ५२ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (ता.४) दिली.  राज्यस्तरीय अहवालात खाजगी प्रयोगशाळांमधील अहवालांचा समावेश करण्यात आलेला आहे.

शनिवारी राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी १ रुग्ण मुंब्रा ठाणे येथील तर १ रुग्ण अमरावती येथील आहे. उर्वरित ४ रुग्ण मुंबई येथील आहेत. मुंब्रा येथील ५७ वर्षीय पुरुषाचा सकाळी केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते. नायर रुग्णालयात काल संध्याकाळी एका ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला फुप्फुसाचा तसेच हृदयविकार होता. केईएम रुग्णालयात पन्नाशीच्या वरील तीन पुरुषांचा मृत्यू झाला. अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात एका ४७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या व्यक्तीला अस्थमाचा त्रास होता. यामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२ झाली आहे.

एकूण ५२ जणांना घरी सोडले राज्यात आज एकूण ७०८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ हजार ५०३ नमुन्यांपैकी १३ हजार ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२ हजार ७१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २९१३ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १२२५ व्यक्तींच्या यादीपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. 

कोविड १९ स्वयंनिर्णय ॲप राज्याने सर्वसामान्य जनतेसाठी महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीच्या मदतीने कोविड १९ स्वयंनिर्णय ॲप तयार केले आहे. या ॲपमुळे स्वतःमध्ये दिसणारी लक्षणे आणि इतर माहितीच्या आधारे कोविड १९ चाचणी करावी किंवा कसे, कोठे वैद्यकीय सेवा घ्यावी, याबाबत मार्गदर्शन मिळते. सर्वसामान्य जनतेने http://covid-१९.maharashtra.gov.in या लिंकवर उपलब्ध आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com