Agriculture news in marathi 64 moments for those on duty this year | Page 3 ||| Agrowon

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ६४ मुहूर्त 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

कोरोनामुळे वेळेवर तारखांत बदल करावा लागत असल्याने अनेक जण अडचणीमध्ये सापडतात. अशातच गुरू आणि शुक्र अस्त आल्याने ‘यंदा कर्तव्य आहे’ अशा वधू-वरांसाठी या मराठी वर्षामध्ये फक्त ६४ शुभ मुहूर्ताच्या तारखा आहेत. 

नागपूर : कोरोनामुळे वेळेवर तारखांत बदल करावा लागत असल्याने अनेक जण अडचणीमध्ये सापडतात. अशातच गुरू आणि शुक्र अस्त आल्याने ‘यंदा कर्तव्य आहे’ अशा वधू-वरांसाठी या मराठी वर्षामध्ये फक्त ६४ शुभ मुहूर्ताच्या तारखा आहेत. 

मराठी नववर्षांमध्ये २४ एप्रिलपासून सनईचे सूर वाजण्यास सुरुवात होणार आहे. या वर्षी लग्नाच्या बोहल्यावर जाणाऱ्या वधू-वरांसाठी ६४ तारखा शुभ मुहूर्त म्हणून आहेत. यापैकी, सर्वाधिक १३ लग्नतिथी मे महिन्यात आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये चातुर्मास असल्याने शुभ मुहूर्त नाहीत. तर, गुरू अस्त, शुक्र अस्त असल्याने फेब्रुवारी २०२२ आणि मार्च २०२२ मध्ये शुभ मुहूर्त नाहीत. कोरोनामुळे वधू-वर पित्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपत्कालीन लग्न करण्याची वेळ आल्यास काही मुहूर्त देण्यात आले आहेत. 

कोरोना नियमांचे पालन करीत निर्विघ्न पार पाडा लग्न! 
लग्न म्हटले की काही ना काही विघ्न ठरलेलेच! आता तर कोरोनाच्या रूपाने सर्वांत मोठे विघ्न आलेले आहे. हे संकट मोठे असले तरी त्यावरही मार्ग आहेच. विवाह सोहळ्यासाठी ठरवून दिलेले नियम आणि निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. विवाहासारख्या मंगल प्रसंगाला गालबोट लागू नये म्हणून मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत योग्य काळजी घेत नवरीला घरी घेऊन या! 

विवाह शुभ मुहूर्त : 
एप्रिल - २४, २५, २६, २८, २९, ३० (६ मुहूर्त) 
मे - १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २८, ३०, ३१ (१३ मुहूर्त) 
जून - ४, ६, १६, १९, २०, २६, २८ (७ मुहूर्त) 
जुलै - १, २, ३, १३, १५ (५ मुहूर्त) 
नोव्हेंबर - २०, २१, २९, ३० (४ मुहूर्त) 
डिसेंबर - ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९, ३१ (११ मुहूर्त) 
जानेवारी - २०, २२, २३, २, २६, २७, २९ (७ मुहूर्त) 
फेब्रुवारी - ५, ६, ७, १०, १६, १७ (६ मुहूर्त) 
मार्च - २३, २५, २६, २८, २९ (५ मुहूर्त) 

गुरू, शुक्र अस्तातील विवाह मुहूर्त : 
फेब्रुवारी - २०, २१, २२, २३, २४, २५ (६ मुहूर्त) 
मार्च - ४, ५, ९, १०, २० (५ मुहूर्त) 

चातुर्मासातील विवाह योग्य दिवस : 
ऑगस्ट - १०, ११, १४, १८, २०, २१, २६, २७ (८ मुहूर्त) 
सप्टेंबर - १६ (फक्त १ मुहूर्त) 
ऑक्टोबर - ८, १०, ११, १२, १८, १९, २०, २१, २४ (९ मुहूर्त) 

गुरू, शुक्राचा अस्त आणि चातुर्मासात लग्नाच्या तारखा काढण्यात येत नाही. मात्र जीवनशैलीतील होणारे बदल व कोरोनाची परिस्थिती पाहता अत्यावश्यक परिस्थितीसाठी मुहूर्त काढले आहेत. या मुहूर्तांमध्ये ज्या ग्रहाचा अस्त असेल त्याचे पूजन करून लग्न सोहळा पार पाडावा. 
- डॉ. अनिल वैद्य, ज्योतिषाचार्य 


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...