crop insurance
crop insurance

अमरावती : पीकविमा नुकसानभरपाईपासून ६४ हजार शेतकरी वंचित

अमरावती ः जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यांत मॉन्सूनोत्तर पावासाने हजेरी लावली होती. यामुळे खरीप हंगामातील पिकाचे ८० टक्‍के नुकसान झाले. परंतु, त्यानंतरही ६४ हजार ९१ शेतकरी भरपाईपासून वंचित असल्याचे वास्तव समोर आले आहे.  जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाने सोयाबीन पिकाचे २ लाख १२ हजार ३२९ हेक्‍टर, कपाशीचे १ लाख ३५ हजार ४७२, ज्वारी ११ हजार ३५, तूर २७०६, मका ५०६३, धान ५५३८, उडीद १२६ व इतर पिकांखालील ७४७ हेक्‍टरचे नुकसान झाले. सुमारे ३ लाख ७३ हजार १९ हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे सर्व्हेक्षण व पंचनाम्याअंती समोर आले. या बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून हेक्‍टरी ८ हजार रुपये दोन हेक्‍टरच्या मर्यादेत जिरायती पिकांसाठी तर बागायती पिकांसाठी १८ हजार रुपये याप्रमाणे मदत जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ७३ कोटी ४० लाख ९३ हजार व दुसऱ्या टप्प्यात १५८ कोटी २२ लाख ३३ हजार उपलब्ध करण्यात आले.  सद्य:स्थितीत या मदतनिधीपैकी २२४ कोटी २ लाख १७ हजार रुपयांचे वाटप २ लाख ८५ हजार ५७३ शेतकऱ्यांना करण्यात आले. त्यानंतरही सुमारे ६४ हजार ९१ शेतकरी भरपाईपासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ४५ कोटी ९८ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. तालुकानिहाय्य मागणी  

भातकुली   ५,३६,९६,०००
तिवसा  २,२७,५८,०००
चांदूररेल्वे   ४,१४,९९,०००
धामणगावरेल्वे  ३,३८,१५,०३२
नांदगाव खंडेश्‍वर   ६,८३,२०,६४२
मोर्शी   १,७५,००,०००
अचलपूर   ६,५०,००,०००
चांदूरबाजार ५,७४,२६,४४९
दर्यापूर   ६,०६,३०,४२२
अंजनावसूर्जी   ३,८२,४७,१२०
धारणी  १०,००,०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com