‘पणन’च्या सुविधा केंद्रातून ६४८ टन कांदा निर्यात

केंद्रात वातानुकूलित व्यवस्था असल्याने शेतमाल साठवणूक करून कंटनेर लोडींग करता येते. पणन विभागीय कार्यालय नाशिक ह्याच्या मार्गदर्शन लाभत होते. -विश्वपाल मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी,सतगुरू इंटरप्रायजेस
export
export

नाशिक: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या भेंडी (ता. कळवण) येथील निर्यात सुविधा केंद्रातून लॉकडाउनमध्ये मार्च ते जूनदरम्यान दुबई, मलेशिया, युरोपमध्ये ६४८ टन कांदा निर्यात करण्यात आली आहे. या केंद्रातून सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करत मजुरांनी कामे केली. लॉकडाउनमुळे शेतमाल खरेदी, हाताळणी प्रतवारी करून पॅकेजिंगकामी या सुविधा केंद्राचा मोठा हातभार लागला, अशी माहिती सूत्रांनी दिली.  लॉकडाउनमध्ये सुरुवातीला कामकाज ठप्प असले तरी सरकारने शेतीसंबंधी कामे सुरू ठेवण्यास मुभा दिली होती. यामुळे निर्यातदार प्रशांत नारकर यांच्या माध्यमातून निर्यात सुरू ठेवली. त्यांनी मलेशिया, दुबई व युरोप आदी देशांमधून मागणी नोंदवून परिसरातील खरेदी केली. त्यांनंतर निर्यात सुविधा केंद्रातून १०,१८ व २५ किलो प्रमाणे पॅकेजिंग करताना कामगारांकडून नियमाचे पालन होईल अशा पद्धतीने व्यवस्था केली.  दुबईमध्ये २२ टन खरबूज व १२ टन मिरचीची निर्यात केली आहे. या शिवाय परिसरातील शेतकरी उत्पादन कंपन्याही या सुविधा केंद्रात पॅकेजिंग करून त्यांनाच शेतमाल मुंबईसह दिल्ली, राजस्थान, गुजरात, केरळ येथे पाठवीत आहेत. पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनीही याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या.  यासाठी शेतकरी व निर्यातदारांना राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे, पणन नाशिक कार्यालयाचे उपसव्यवस्थापक सी. एस. बारी व बी. सी. देशमुख व पुणे निर्यात विभागाचे सतीश वराडे व मुंबई अपेडाचे प्रशांत वाघमारे, लोकेश गौतम यांचे मार्गदर्शन मिळत आहे. मार्च ते जून काळात झालेली कांदा निर्यात (टनांत) २८  युरोप ५१०  दुबई ११०  मलेशिया

प्रतिक्रिया लॉकडाउन काळात शेतमाल वाहतुकीसाठी सुरुवातीला अडचण निर्माण होती व विविध देशांत भरपूर मागणी वाढत होती याची माहिती नोंदवून निर्यात सुरू होती. -प्रशांत नारकर, निर्यातदार 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com