agriculture news in marathi, 65% fertilizer in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात ६५ टक्‍के खतपुरवठा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 जुलै 2018

जळगाव :  जिल्ह्यात खरीप हंगामासाठी लागणारा रासायनिक खतांचा ६५ टक्‍के पुरवठा झाला आहे. पावसाने साधारण महिनाभर दडी मारल्याने पेरण्या लांबल्या होत्या. यातच आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांकडून खतांची खरेदी जास्त प्रमाणात झालेली नाही. परंतु युरियाचा पुरवठा अतिशय कमी असून, पुरवठ्याची टक्केवारी फक्त ४० टक्केच राहिल्याची माहिती आहे.

जळगाव :  जिल्ह्यात खरीप हंगामासाठी लागणारा रासायनिक खतांचा ६५ टक्‍के पुरवठा झाला आहे. पावसाने साधारण महिनाभर दडी मारल्याने पेरण्या लांबल्या होत्या. यातच आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांकडून खतांची खरेदी जास्त प्रमाणात झालेली नाही. परंतु युरियाचा पुरवठा अतिशय कमी असून, पुरवठ्याची टक्केवारी फक्त ४० टक्केच राहिल्याची माहिती आहे.

केळीची शेती व पूर्वहंगामी कापसाला खतांची गरज असल्याने जिल्ह्यात तापीकाठावर खतांचा वापर अधिक आहे.  त्यात सरळ खतांची उपलब्धता कमी आहे. डीएपी मुबलक असून, युरिया पुरेशा प्रमाणात नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना नाडण्याचे प्रकार सुरू असून, जादा दरात खतांची विक्री केली जाते, अशा तक्रारी आहेत.
शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील ८० टक्‍के पेरण्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी उन्हाळी कपाशी लागवडही झाली आहे. पिकांसाठी आवश्‍यक
रासायनिक खतांचा पुरवठा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मागविला जातो. त्यानुसार यंदासाठी आवश्‍यक खतांची मागणी करण्यात आली असून, खतांची एकूण उपलब्धता १ लाख २१ हजार १४३ टन आहे. 

१९ हजार ४३२ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक
एकूण खतांपैकी १ लाख १ हजार ७११ मेट्रिक टन खतांची विक्री झाली असून, आजअखेरपर्यंत जिल्ह्यात १९ हजार ४३२ मेट्रिक टन इतका खतांचा साठा शिल्लक आहे. यात युरिया ३ हजार ५४, एनपीके १३ हजार ६०९, म्युरिट ऑफ पोटॅश २ हजार २८०, १०-२६-२६ पाच हजार ११३ मेट्रिक टन इतका साठा शिल्लक आहे. खतांचा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

खतांच्या प्रकारानुसार उपलब्धता (आकडे टनांत)

युरिया   ३३,६४५
एस.एस.पी २३,७६०
म्युरिट ऑफ पोटॅश  २३,३२८
डाय.अमो. फॉस्फेट   ३,१८७
अमोनियमन सल्फेट ३५५
२०-२०-२० ३,४३३
१९-१९-१९ १,६१५
२४-२४-० २,९१४
१५-१५-१५   २,९१४
१२-३२-१६   ५,९९१
१०-२६-२६   १५,५७३
१६-१६-१६  ६,१९३
१८-१८-१०  १,२०५
एन.पी.के  ३७,२२३

 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...