Agriculture news in marathi 65 lakhs in Yavatmal Seized bogus Bt seeds | Page 2 ||| Agrowon

यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी बियाणे जप्त

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

यवतमाळ  जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा फायदा घेत आता मोठ्या प्रमाणात परवानगी नसलेली बोगस बियाणे येत आहेत. अमरावती जिल्ह्यातून कळंब येथे जात असलेल्या बीटी बियाण्याची पाकिटे कृषी विभागाने जप्त केले. 

यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा फायदा घेत आता मोठ्या प्रमाणात परवानगी नसलेली बोगस बियाणे येत आहेत. अमरावती जिल्ह्यातून कळंब येथे जात असलेल्या बीटी बियाण्याची पाकिटे कृषी विभागाने जप्त केले. ही कारवाई यवतमाळ-कळंब मार्गावर केली.

दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. दमदार पाऊस झाल्यानंतर दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची जवळपास सर्व तयारी केली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात यंदा साडेनऊ लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यात सर्वाधिक ४ लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जाणार आहे.

२ लाख ७७ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर १ लाख ५० हजार हेक्टरवर तुरीची लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बी-बियाणे, खतांचा साठा करणे, कृषी विभागाने सुरू केलेले आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे कृषी सेवा केंद्रापर्यंत पोहोचले आहे. असे असले तरी परवानगी नसलेले बियाणेही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे.

अमरावती वरून ‘बीटी’ची मोठी खेप येत होती. कृषी विभागाने हा साठा जप्त केला. या संदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई जिल्हा कृषी अधिकारी नीलेश ढाकुलकर, राजेंद्र माळोदे, पंकज बरडे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दतात्रय आवारे आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...