६५ हजार ५८० शेतकऱ्यांच्या  खात्यांवर २७ कोटींचा विमा जमा 

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीबद्दल १ लाख ८१ हजार ८४३ शेतकऱ्यांना ६२ कोटी १० लाख रुपये विमा परतावा मंजूर झाला आहे.
65 thousand 580 farmers 27 crore insurance deposit on accounts
65 thousand 580 farmers 27 crore insurance deposit on accounts

हिंगोली ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीबद्दल १ लाख ८१ हजार ८४३ शेतकऱ्यांना ६२ कोटी १० लाख रुपये विमा परतावा मंजूर झाला आहे. शुक्रवारपर्यंत (ता.३) ६५ हजार ५८० शेतकऱ्यांच्या खात्यावर २७ कोटी ६७ हजार रुपये जमा करण्यात आले. स्थानिक आपत्तीअंतर्गत ७३ हजार ६७७ शेतकऱ्यांचे विमा दावे प्रलंबित आहेत. काढणीपश्‍चात नुकसान परताव्याची गणना प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३ लाख ५१ हजार ३४७ विमा प्रस्ताव सादर करत १ लाख ७६ हजार ६३४ हेक्टरवरील पिकांसाठी ७३४ कोटी ५५ लाख रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले. त्यासाठी विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी १५ कोटी ४५ लाख रुपये, राज्य आणि केंद्र शासनाच्या हिश्‍शाचे प्रत्येकी ४९ कोटी १० लाख रुपये, असा एकूण ११३ कोटी ६४ लाख रुपये विमा हप्ता भरण्यात आला. ऑगस्ट महिन्यात २१ हून अधिक दिवस पावसांचा खंड पडला. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येण्याच्या शक्यतेमुळे मध्यम हंगाम प्रतिकूल स्थितीअंतर्गत जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढत विमा कंपनीला परतावा देण्याचे आदेश दिले. या अंतर्गत एकूण ४८ हजार ८५१ शेतकरी पात्र ठरले असून, त्यांना १९ कोटी ७६ लाख रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला. त्यापैकी १९ कोटी ५७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. 

२ लाख ७८ हजार १६१ पूर्वसूचना आणि सर्वेक्षण  स्थानिक आपत्ती अंतर्गंत पिकांचे नुकसान झाल्याच्या २ लाख ७८ हजार १६१ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, एकूण ७१ हजार ४६९ हजार पूर्वसूचना अपात्र ठरल्या आहेत. एकूण २ लाख ६ हजार ६६९ शेतकऱ्यांपैकी १ लाख ३२ हजार ९९२ शेतकऱ्यांना ४२ कोटी ३४ लाख रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला. काढणीपश्‍चात नुकसानीबद्दल शेतकऱ्यांच्या ७० हजार ११८ पूर्वसूचना प्राप्त झाल्या, त्यापैकी ५८ हजार ३३३ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यापैकी ८४३ पूर्वसूचना अपात्र ठरल्या आहेत. या अंतर्गत परतावा गणनेची प्रक्रिया सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com