agriculture news in Marathi 6.5 thousand hector crop damage Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्टरला ‘अवकाळी’चा फटका 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 मार्च 2021

नगर जिल्ह्यात दोन दिवस (ता. २० व २१) झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे साडेसहा हजार हेक्टरला फटका बसला असून, जिल्हाभरातील सहा तालुक्यांत दहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

नगर ः नगर जिल्ह्यात दोन दिवस (ता. २० व २१) झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे साडेसहा हजार हेक्टरला फटका बसला असून, जिल्हाभरातील सहा तालुक्यांत दहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. दरम्यान, सोमवारीही (ता. २२) काही भागांत पाऊस झाला. 

नगर जिल्ह्यात सहा दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस जोरदार पावसासह गारपीट झाली. अचानक झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या रब्बीतील पिकांसह उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, दोन दिवसांत जिल्हाभरातील ६० पेक्षा अधिक गावांच्या शिवारात साडेसहा हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

राहुरी तालुक्यात सर्वाधिक पावसाचा व गारपिटीचा फटका बसला असून, चार गावांत सहा हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. पाथर्डी तालुक्यात २४ गावांत, तर शेवगावात १६ गावांत गारपिटीने नुकसान झाले. कोपरगाव तालुक्यात एक हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोमवारी काही भागांत पाऊस झाला आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

तालुकानिहाय अंदाज नुकसान (हेक्टर) 
शेवगाव ः ८५४, संगमनेर ः ३५८, पाथर्डी ः ३०४, राहुरी ः ३७३०, नेवासा ः ५६६, कोपरगाव ः ४९४ 

या पिकांचे झालेय नुकसान 
गहू, हरभरा, कांदा, मका, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी बाजरी, चारा पिके, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, द्राक्ष, कागदी लिंबू, कलिंगड, मोसंबी, पेरू, चिकू, पपई, टोमॅटो, संत्रा, आंबा. 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...
तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा...
हापूसच्या ४० हजार पेट्या थेट...रत्नागिरी ः उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी...
कडधान्य उत्पादनात ६५ टक्के वाढ पुणे ः देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...