पालम तालुक्यातील ६५ गावांना मिळणार शुद्ध पाणी ः बबनराव लोणीकर

दीड वर्षात ६५ गावांना मिळणार शुद्ध पाणी ः बबनराव लोणीकर
दीड वर्षात ६५ गावांना मिळणार शुद्ध पाणी ः बबनराव लोणीकर

परभणी ः मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पालम तालुक्यातील ६५ गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत या योजनेत समाविष्ट गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

चाटोरी (ता. पालम) येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ६५ गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये गुरुवारी (ता. ३१) ते बोलत होते. या वेळी माजी आमदार विजय गव्हाणे, गणेश रोकडे, अभय चाटे, राहुल लोणीकर, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, उपविभागीय अधिकारी विश्वांभर गावंडे आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. लोणीकर पुढे म्हणाले की, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यासह श्रीलंका, इस्त्राईल आदी देशांत प्रमुख अधिकाऱ्यांच्या गटासह भेटी देऊन प्रत्यक्ष वॉटर ग्रीडची पाहणी करून नंतरच ही योजना राबविण्यात येत आहे. ६५ गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उर्ध्व मनार प्रकल्प (लिंबोटी धरण) यातून पालम तालुक्यातील ६४ व गंगाखेड तालुक्यातील १ असे एकूण ६५ गावांना पिण्यासाठी, तसेच घरगुती वापरासाठी केवळ १० रुपयांत एक हजार लिटर पाणी मिळणार आहे.

जिल्ह्यात रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात येत आहे. ६५ गावे ग्रीड पाणीपुरवठा योजना १०० वर्षे टिकावी यासाठी गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर दिला जात आहे. संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला गुणवत्तापूर्ण काम करावे, असे निर्देश लोणीकर यांनी दिले. 

श्री. पी. शिवशंकर म्हणाले, ‘‘६५ गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेमुळे प्रकल्पातील पाणी थेट गावापर्यंत पोहोचणार असून ६५ गावांतील वॉटर ग्रीड सुरू झाल्यास उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होऊन टँकरमुक्त गाव होण्यास मदत होईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ६५ गावे ग्रीड पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून या योजनेची अंदाजित किंमत ५६ कोटी ६४ लाख रुपये आहे.’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com