नाशिक जिल्ह्यातील ६५० विद्युत खांब कोसळले

नाशिक : जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला फटका बसला. नाशिक शहर व मालेगाव मंडळात जवळपास लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त वीज खांब कोसळले.
  650 power poles collapsed in Nashik district
650 power poles collapsed in Nashik district

नाशिक : जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला फटका बसला. नाशिक शहर व मालेगाव मंडळात जवळपास लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त वीज खांब कोसळले.

यामध्ये ९८ उपकेंद्रे आणि १ हजार ७४ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तर, काही भागात सुरक्षेसाठी बंद करावा लागला होता. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू केले. बहुंताश ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत केला. 

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडले. वृक्ष, झाडांच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्या. वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बंद झाला. अनेक वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला. 

जिल्ह्यातील ७५३ वाहिन्यांचा पूरवठा प्रभावित झाला. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या या पावसात दोष शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराच्या कामगारांनी प्रयत्न सुरु केले. मात्र, प्रचंड वाऱ्याच्या वेगामुळे दुरुस्ती कार्यात अडथळे निर्माण झाले. वादळ ओसरताच गुरुवार (ता.४) दुपारपर्यंत नाशिक शहरातील व जिल्ह्यातील बहुतांश वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळविले. 

महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंते रमेश सानप आणि प्रविण दरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंते, जनमित्र सातत्याने कार्य करीत आहेत. इलेक्ट्रिक खांब कोसळला असल्यास, वीज वाहिनी तुटल्यास किंवा रोहित्र जळाल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३३४३५/१८००१०२३४३५/१९१२ यावर, आपात्कालीन परिस्थितीत तात्काळ संबंधित महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com