भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात ‘महाडीबीटी’चे ६५ हजार अर्ज
पुणे ः कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेवटच्या टप्प्यात अर्ज भरताना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे अर्ज भरण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील ६५ हजार २५७ अर्ज दाखल झाले आहेत.
पुणे ः कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेवटच्या टप्प्यात अर्ज भरताना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे अर्ज भरण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील ६५ हजार २५७ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये ट्रॅक्टरसाठी सर्वाधिक २२ हजार ६६९ अर्ज आले आहेत.
यंदा कृषी विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’या सदराखाली सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली. त्यावर अर्ज भरण्यासाठी मुदत संपताना सर्व्हर डाउन होत होते. यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून झाली. तरीही कृषी विभागाने त्याकडे फारसे लक्ष न दिल्याचे चित्र होते.
या पोर्टलवर पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले. शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा होता. त्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत होती. त्यानंतर कृषी आयुक्तांनी ११ जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली. अखेरच्या दोन ते तीन दिवसांत अडचणी आल्या. त्या वेळेत दुरुस्त केल्या असत्या, तर अर्जाच्या संख्येत अधिक वाढ झाली असती.
सोडत होणार ऑनलाइन
आता कृषी विभागाकडे आलेल्या पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाइन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी, तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.
यांत्रिकीकरणांतर्गत आलेले अर्ज
भोर ११२३, वेल्हा ३३६, मुळशी ४८२, मावळ ७९७, हवेली १८२६, खेड ३४५९, आंबेगाव ३४४८, जुन्नर ७५५४, शिरूर १२,८३७, पुरंदर ३१८२, बारामती ९८३२, दौंड ९२५५, इंदापूर ११,१२६.
- 1 of 1059
- ››