agriculture news in marathi, 65.18% water supply in Isapur dam | Agrowon

इसापूर धरणात ६५.१८ टक्के जलसाठा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे रब्बी हंगामासाठी पाणी मिळणे शक्‍य होणार आहे. पंधरवड्यात राखण्यात येणाऱ्या जलपातळीवर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्‍यता आहे. सिंचनाव्यतिरिक्त धरणातून १०० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यात पुसद तालुक्‍यातील माळपठारावरील ४० गावांचा समावेश आहे, तर उर्वरित ६० गावे हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील आहेत.
- बी. जे. माने, कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर धरण

शेंबाळपिंपरी, यवतमाळ  : विदर्भ-मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीवरील इसापूर धरणात गुरुवारी (ता.३०) ६५.१८ टक्के जलसाठा संचयित झाला. पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसामुळे विदर्भ-मराठवाड्यातील सव्वा लाख हेक्‍टरवरील रब्बी हंगामाच्या सिंचनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे परिसरातील कास्तकारांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

इसापूर धरणाला ६६.१८ टक्के पाणीपातळी गाठण्यासाठी तब्बल चार वर्षे प्रतीक्षा करावी लागली. गेल्या सहा वर्षांपासून इसापूर धरणात प्रथमच पाण्याचा बंपर स्टॉक झाला आहे. धरणाची एकूण पाणी क्षमता ४४१ मीटर असून, सध्यस्थितीत ४३७.५७ मीटर जलसाठा झाला आहे.

सिरसम, खंडाळा, अनसिंग, गोरेगाव, गोवर्धन, शिरपूर, डोणगाव, सारखेडा, वाशीम, रिसोड, मेहकर या परिसरात समाधानकारक पर्जन्यमान झाले. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील एक लाख २५ हजार ४९० हेक्‍टर शेतजमिनाचा रब्बी हंगामासाठी सिंचनाचा मार्ग मोकळा झाला आहे. धरणाच्या पाण्यातून विदर्भातील ८४ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याद्वारे यवतमाळ जिल्ह्यातील १९ हजार ३२० हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येते, तर ११७ किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचा ९२ हजार २१० हेक्‍टर आणि हिंगोली जिल्ह्याचा १३ हजार ९६० हेक्‍टर शेतजमिनीचा भाग सिंचनाखाली येतो. मागील वर्षी या महिन्यात धरणात फक्त १४ टक्के जलसाठा झाला होता.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...