आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींसाठी मतदारांची प्रारूप यादी तयार
सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार या ग्रामपंचायतींची प्रारूप मतदार यादी एक डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे. या मतदार यादीवर सात डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवता येतील. या प्रक्रियेनंतर १० डिसेंबरला मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
जून ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ६५८ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी ही यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये नाव आहे का? नावामध्ये काही बदल वा दुरुस्ती हवी असल्यास ती आता सुचवता येणार आहे.
शिवाय, ज्या प्रभागात राहता, त्या ठिकाणी नाव आहे का ? याची तपासणी करता येणार आहे. काही बदल असल्यास तत्काळ ग्रामसेवक वा तलाठी यांच्याकडे हरकत नोंदवता येणार आहे. ८ ते १० डिसेंबर या कालावधीत हरकतीनुसार मतदार यादीमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यानंतर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे निवडणूक अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.