agriculture news in marathi, 67% reduction in soybean seed production | Page 2 ||| Agrowon

सोयाबीनच्या बीजोत्पादनात ६७ टक्क्यांनी घट

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

परभणी : जुलै-आॅगस्ट महिन्यांतील पावसाच्या दीर्घ खंडामुळे उतारा घटला. त्यानंतर ऐन काढणीच्या काळात पाऊस आल्याने दाणे भिजून खराब झाले. उगवण शक्ती कमी झाली आहे. परिणामी नापास बियाणाचे प्रमाण वाढल्याने यंदा महाबीजच्या परभणी विभागात सोयाबीनच्या बीजोत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत ६५ ते ६७ हजार क्विंटलपर्यंत घट आली आहे.

परभणी : जुलै-आॅगस्ट महिन्यांतील पावसाच्या दीर्घ खंडामुळे उतारा घटला. त्यानंतर ऐन काढणीच्या काळात पाऊस आल्याने दाणे भिजून खराब झाले. उगवण शक्ती कमी झाली आहे. परिणामी नापास बियाणाचे प्रमाण वाढल्याने यंदा महाबीजच्या परभणी विभागात सोयाबीनच्या बीजोत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत ६५ ते ६७ हजार क्विंटलपर्यंत घट आली आहे.

यंदा २ लाख ६० हजार ३४ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. नापास बियाणाचे प्रमाण वाढल्यामुळे बीजोत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन बियाणाची उगवणशक्ती जास्त तर परभणी, नांदेड, लातूर, सोलापूर या चार जिल्ह्यांतील बियाणाची उगवण शक्ती कमी असल्याचे चाचण्याच्या निष्कर्षावरून स्पष्ट झाले आहे.

महाबीजच्या परभणी विभागांतर्गत सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केलेल्या २० हजार ६८८ हेक्टरवरील सोयाबीन पिकांपासून ९ हजार ११ शेतकऱ्यांकडून २ लाख ९२ हजार ५९३ क्विंटल बीजोत्पादन अपेक्षित होते. परंतु, सोयाबीनच्या पेरणी नंतर जुलै-आॅगस्टमध्ये आलेल्या पावसाच्या दीर्घ खंडामुळे उताऱ्यामध्ये मोठी घट आली.

त्यानंतर सप्टेंबरच्या अखेरीस आणि आॅक्टोबरच्या सुरवातीस ऐन काढणीच्या काळात पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा पावसात भिजून दाण्यावर बुरशी वाढली. काही भागात शेंग किडीमुळे कळकाचे प्रमाण वाढले आहे. या बाबींचा परिणाम बियाणाच्या उगवण शक्तीवर झाला आहे. उगवणशक्ती ७० टक्के पेक्षा कमी येत असल्यामुळे नापास बियाणाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत वाढले आहे.

बुधवार (ता.२७) पर्यंत योग्य उगवणशक्ती असलेल्या ४ हजार ७४७ लाॅटचे २ लाख ६० हजार ३४ क्विंटल बियाणे पास करण्यात आले आहे. पास झालेल्या बियाणांपैकी ३ हजार ७१७ शेतकऱ्यांचे १ लाख ९५ हजार ८३३ क्विंटल बियाणे महाबीजकडे जमा झाले आहे.

यामध्ये परभणी जिल्ह्यातील ७२७ शेतकऱ्यांच्या ४३ हजार ९७८ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यातील १ हजार ५११ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ५० क्विंटल, नांदेड जिल्ह्यातील २२८ शेतकऱ्यांच्या १५ हजार ७०० क्विंटल, लातूर जिल्ह्यातील ३१६ शेतकऱ्यांच्या १४ हजार ५९४ क्विंटल, उस्मानाबाद जिल्ह्यातील ७२९ शेतकऱ्यांच्या ३५ हजार क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील २१ शेतकऱ्यांच्या ७०३ क्विंटल बियाणाचा समावेश आहे.
२०१६ मध्ये सोयाबीनचे ३ लाख २७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले होते.

गतवर्षीच्या तुलनेत ६५ ते ६७ हजार क्विंटलची घट आली आहे. यंदा मूग, उडिद बीजोत्पादनाला पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे. एकूण ४२ शेतकऱ्यांचे ३२९ क्विंटल मुगाचे आणि १६६ शेतकऱ्यांचे १ हजार ४३७ क्विंटल उडिदाचे बियाणे महाबीजकडे प्राप्त झाले आहे.

यंदा पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचा एकरी दीड क्विंटल उतारा आला आहे. काढणीच्या वेळी पावसात भिजून डागील झाल्यामुळे लो ग्रेड बियाणाचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी एकरी नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले होते.
- नरेश शिंदे, बीजोत्पादक शेतकरी,
सनपुरी, जि. परभणी.


इतर बातम्या
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
वंचितच्या ‘बंद’चा बाजारपेठांवर परिणामअकोला  ः सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
शेतकरी करणार नाना पटोले यांचा सत्कारअकोला  ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
पशुगणना प्रगणकांचे मानधन थकलेसांगली : पशुविभागाकडून जिल्ह्यातील एप्रिल-मे...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...