मराठवाड्यात नुकसानग्रस्त पिकांचे ६७.२६ टक्‍के पंचनामे पूर्ण

औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र अतिपावसाने बाधित झाले. त्यानंतर त्यापैकी जवळपास ६७.२६ टक्‍के क्षेत्रावरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पंचनाम्याची गती वाढवून नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने तत्परता दाखवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
 67.26 per cent panchnama of damaged crops completed in Marathwada
67.26 per cent panchnama of damaged crops completed in Marathwada

औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र अतिपावसाने बाधित झाले. त्यानंतर त्यापैकी जवळपास ६७.२६ टक्‍के क्षेत्रावरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पंचनाम्याची गती वाढवून नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने तत्परता दाखवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास २१ लाख ४१ हजार २७६ शेतकऱ्यांच्या १५ लाख ३८ हजार ४७२ हेक्‍टर ६८ गुंठ्यांवरील शेतीपीक अतिवृष्टीमुळे बाधित झाले. नुकसानग्रस्त क्षेत्रापैकी २२ सप्टेंबरपर्यंत जवळपास १० लाख ३४ हजार ७३३ हेक्‍टरवरील, अर्थात ६७.२६ टक्‍क्‍यांवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यामध्ये हिंगोली, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील नुकसानीचे पंचनामे संपले होते. 

एकीकडे पंचनाम्याचे चक्र धीम्या गतीने पुढे सरकत असतानाच पावसाचे सतत होणारे आक्रमण शेतिपिकाची वाताहत करते आहे. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्यासोबत वाचलेल्या पिकांमधून येणाऱ्या उत्पादनात घट येणार, हे निश्‍चित मानले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे ५२.९४ टक्‍केच नुकसानीच्या पंचनाम्याचे काम झाले आहे.

जालना जिल्ह्यात ७१.७६ टक्‍के, परभणीत ६३.८१ टक्‍के, नांदेडमध्ये ७१.४६ टक्‍के, बीड जिल्ह्यात ६८.२९ टक्‍के, तर हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत १०० टक्‍के नुकसानीच्या पंचनाम्याचे काम झाल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

आता पुन्हा तीन दिवसांपासून सतत अतिजोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जवळपास ७० ते ८० टक्‍के पिके हातची गेली आहेत. नुकसानीची पाहणी करून भागणार नाही. विम्याचा परतावा व भरपाई शेतकऱ्यांना तत्परतेने मिळवून देण्यासाठी शासनाने व प्रशासनाने पावले उचलावीत. - ईश्‍वर सपकाळ, तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद

२५ एकर तूर सततच्या पावसाने वाळून चालली आहे. तिला वाचविण्यासाठी प्रयत्न चालविले. मात्र त्यात यश नाही. पाऊस काही पाठलाग सोडेना. कपाशी हिरवी दिसती, पण तिला ना पाते, ना बोंड. शिवाय रब्बी पेरणीची चिंता आहेच. - दीपक बुनगे, रामगव्हाण, ता. घनसावंगी, जि. जालना  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com