Agriculture news in marathi, 67.26 per cent panchnama of damaged crops completed in Marathwada | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात नुकसानग्रस्त पिकांचे ६७.२६ टक्‍के पंचनामे पूर्ण

शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र अतिपावसाने बाधित झाले. त्यानंतर त्यापैकी जवळपास ६७.२६ टक्‍के क्षेत्रावरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पंचनाम्याची गती वाढवून नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने तत्परता दाखवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र अतिपावसाने बाधित झाले. त्यानंतर त्यापैकी जवळपास ६७.२६ टक्‍के क्षेत्रावरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पंचनाम्याची गती वाढवून नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने तत्परता दाखवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास २१ लाख ४१ हजार २७६ शेतकऱ्यांच्या १५ लाख ३८ हजार ४७२ हेक्‍टर ६८ गुंठ्यांवरील शेतीपीक अतिवृष्टीमुळे बाधित झाले. नुकसानग्रस्त क्षेत्रापैकी २२ सप्टेंबरपर्यंत जवळपास १० लाख ३४ हजार ७३३ हेक्‍टरवरील, अर्थात ६७.२६ टक्‍क्‍यांवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यामध्ये हिंगोली, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील नुकसानीचे पंचनामे संपले होते. 

एकीकडे पंचनाम्याचे चक्र धीम्या गतीने पुढे सरकत असतानाच पावसाचे सतत होणारे आक्रमण शेतिपिकाची वाताहत करते आहे. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्यासोबत वाचलेल्या पिकांमधून येणाऱ्या उत्पादनात घट येणार, हे निश्‍चित मानले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे ५२.९४ टक्‍केच नुकसानीच्या पंचनाम्याचे काम झाले आहे.

जालना जिल्ह्यात ७१.७६ टक्‍के, परभणीत ६३.८१ टक्‍के, नांदेडमध्ये ७१.४६ टक्‍के, बीड जिल्ह्यात ६८.२९ टक्‍के, तर हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत १०० टक्‍के नुकसानीच्या पंचनाम्याचे काम झाल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

आता पुन्हा तीन दिवसांपासून सतत अतिजोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जवळपास ७० ते ८० टक्‍के पिके हातची गेली आहेत. नुकसानीची पाहणी करून भागणार नाही. विम्याचा परतावा व भरपाई शेतकऱ्यांना तत्परतेने मिळवून देण्यासाठी शासनाने व प्रशासनाने पावले उचलावीत.
- ईश्‍वर सपकाळ, तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद

२५ एकर तूर सततच्या पावसाने वाळून चालली आहे. तिला वाचविण्यासाठी प्रयत्न चालविले. मात्र त्यात यश नाही. पाऊस काही पाठलाग सोडेना. कपाशी हिरवी दिसती, पण तिला ना पाते, ना बोंड. शिवाय रब्बी पेरणीची चिंता आहेच.
- दीपक बुनगे, रामगव्हाण, ता. घनसावंगी, जि. जालना
 

टॅग्स

इतर बातम्या
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
परभणी १३३, तर हिंगोलीत १४४ टक्के...परभणी ः यंदाच्या (२०२१-२२) रब्बी हंगामात शुक्रवार...
६५ हजार ५८० शेतकऱ्यांच्या  खात्यांवर...हिंगोली ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
महाकृषी ऊर्जा अभियानाला  नगर जिल्ह्यात...नगर ः राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी  बंद;...कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबा...
धान वाहतुकीत शासनाला लावला चुना गोंदिया : आदिवासी विकास महामंडळांतर्गत धानाची...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...
कांदा रोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची...आपटाळे, जि. पुणे ः मॉन्सूनोत्तर पाऊस, सततचे ढगाळ...
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...