Agriculture news in marathi, 67.26 per cent panchnama of damaged crops completed in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात नुकसानग्रस्त पिकांचे ६७.२६ टक्‍के पंचनामे पूर्ण

शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र अतिपावसाने बाधित झाले. त्यानंतर त्यापैकी जवळपास ६७.२६ टक्‍के क्षेत्रावरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पंचनाम्याची गती वाढवून नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने तत्परता दाखवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र अतिपावसाने बाधित झाले. त्यानंतर त्यापैकी जवळपास ६७.२६ टक्‍के क्षेत्रावरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पंचनाम्याची गती वाढवून नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने तत्परता दाखवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास २१ लाख ४१ हजार २७६ शेतकऱ्यांच्या १५ लाख ३८ हजार ४७२ हेक्‍टर ६८ गुंठ्यांवरील शेतीपीक अतिवृष्टीमुळे बाधित झाले. नुकसानग्रस्त क्षेत्रापैकी २२ सप्टेंबरपर्यंत जवळपास १० लाख ३४ हजार ७३३ हेक्‍टरवरील, अर्थात ६७.२६ टक्‍क्‍यांवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यामध्ये हिंगोली, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील नुकसानीचे पंचनामे संपले होते. 

एकीकडे पंचनाम्याचे चक्र धीम्या गतीने पुढे सरकत असतानाच पावसाचे सतत होणारे आक्रमण शेतिपिकाची वाताहत करते आहे. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्यासोबत वाचलेल्या पिकांमधून येणाऱ्या उत्पादनात घट येणार, हे निश्‍चित मानले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे ५२.९४ टक्‍केच नुकसानीच्या पंचनाम्याचे काम झाले आहे.

जालना जिल्ह्यात ७१.७६ टक्‍के, परभणीत ६३.८१ टक्‍के, नांदेडमध्ये ७१.४६ टक्‍के, बीड जिल्ह्यात ६८.२९ टक्‍के, तर हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत १०० टक्‍के नुकसानीच्या पंचनाम्याचे काम झाल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

आता पुन्हा तीन दिवसांपासून सतत अतिजोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जवळपास ७० ते ८० टक्‍के पिके हातची गेली आहेत. नुकसानीची पाहणी करून भागणार नाही. विम्याचा परतावा व भरपाई शेतकऱ्यांना तत्परतेने मिळवून देण्यासाठी शासनाने व प्रशासनाने पावले उचलावीत.
- ईश्‍वर सपकाळ, तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद

२५ एकर तूर सततच्या पावसाने वाळून चालली आहे. तिला वाचविण्यासाठी प्रयत्न चालविले. मात्र त्यात यश नाही. पाऊस काही पाठलाग सोडेना. कपाशी हिरवी दिसती, पण तिला ना पाते, ना बोंड. शिवाय रब्बी पेरणीची चिंता आहेच.
- दीपक बुनगे, रामगव्हाण, ता. घनसावंगी, जि. जालना
 

टॅग्स

इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...