agriculture news in marathi, 686 cases of 'debt waiver' in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्याला ६८६ काेटींची 'कर्जमाफी'

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 जुलै 2018

नाशिक :  राज्य शासनाने गतवर्षी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना' अाणली हाेती. या याेजनेमधून ९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ५६ हजार ५५६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला अाहे, अशी माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.

नाशिक :  राज्य शासनाने गतवर्षी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना' अाणली हाेती. या याेजनेमधून ९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ५६ हजार ५५६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला अाहे, अशी माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक अाणि इतर बॅँकांना कर्जमाफी, प्राेत्साहन अनुदान यासाठी ६८६ काेटी ६४ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मिळाला अाहे. यापैकी सर्वाधिक ५८० काेटी ५४ लाख ६३ हजारांचा निधी एकट्या जिल्हा बँकेला मिळाला अाहे. बँकेच्या १ लाख १४ हजार ६९१ खातेदारांना अात्तापर्यंत या कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे समाेर अाले अाहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत या याेजनेचा लाभ पाेचेल, असे स्पष्ट केले हाेते. यामुळेच या याेजनेला अात्तापर्यंत तीन वेळा मुदतवाढही दिली गेल्याचे मानले जाते. या याेजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, २५ हजारांपर्यंतचे प्राेत्साहन अनुदान अाणि दीड लाखावरील थकीत कर्जाची रक्कम भरल्यास दीड लाख रुपयांचे कर्ज माफ अशा तीन प्रकारांत शेतकऱ्यांना लाभ मिळत अाहे.

मालेगाव तालुक्याला सर्वाधिक लाभ
तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ९० काेटी ९५ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ ३५ हजार ९६८ शेतकऱ्यांना मिळाला. त्यानंतर सटाणा तालुक्यातील २५ हजार ९३ शेतकऱ्यांना ७३ काेटी ७५५ लाखांचा तर येवला तालुक्यातील २२ हजार ४५८ शेतकऱ्यांना ५५ काेटी २३ लाख ९८ हजार रुपयांचा लाभ मिळाला अाहे. अादिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या पेठ तालुक्यात केवळ ३ हजार ९१५ शेतकऱ्यांना ५ काेटी २८ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. लाभाची रक्कम सरकारने लाभार्थींच्या बॅंक खात्यात वर्ग केलेली अाहे.


इतर ताज्या घडामोडी
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...
अकोल्यात भारिप, वाशीममध्ये...अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष...
पुणे जिल्ह्यात उद्या पल्स पोलिओ लसीकरण...पुणे : पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या...
पत्नीच्या नावे कामकाजासाठी येणाऱ्या...बुलडाणा ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना...
पाणी, शेती विकासासह समाजकारणाला...नगर : निवडणुकीत पराभव मी मानत नाही. लोकांचे...
पुणे जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकट्याचा...पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम जिरायत भागात...
प्रशासकीय कामकाज सेवा हमी कायद्यानुसार...अकोला ः शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत...
वीज रोहित्र ४८ तासांत बदलून द्या;...अकोला ः वीज रोहित्रांबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य...
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना न्याय न...मुंबई ः केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने...
पुणे, मुंबई बाजार समितीच्या निवडणुका...पुणे ः उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या...
फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट...मुंबई ः काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट २०१९ व २९ ऑगस्ट...
शेतीमाल निर्यातबंदी उठवण्यासाठी लढा...औरंगाबाद : शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण...
साखर उद्योग सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील...पुणे ः साखर उद्योगाचे एक चक्र असून, या उद्योगाला...
‘किसान सन्मान’ निधी : दोष प्रशासनाचा,...जळगाव : शासकीय यंत्रणेकडून बॅंक खात्यासंबंधीची...