वैधानिक विकास महामंडळाकडे ७ कोटींचा प्रस्ताव

7 crore proposal to the Legal Development Corporation
7 crore proposal to the Legal Development Corporation

नांदेड : बैलचलित बहुउद्देशीय कृषी यंत्रसामग्री आणि मानव विकास कार्यक्रम क्षेत्रांतर्गत ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७ कोटी २८ लाख रुपयाचा प्रस्ताव वैधानिक विकास महामंडळाकडे सादर करण्यात आला.

मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॅा. भागवत कराड यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २८) बैठक झाली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी एकूण ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत ४ कोटी १० लाख रुपये, महिला आर्थिक विकास महामंडळातंर्गंत महिला बचत गटांसाठी बैल चलित बहुउद्देशीय शेती यंत्र, शेतकरी स्वयंरोजगार किटसाठी १ कोटी ५९ लाख रुपये, टेलरिंग युनिट गारमेंट सेंटरसाठी  ७५ लाख रुपये, हिमायतनगर येथील महिला बचत गटांना यंत्रांसाठी ६ लाख १५ हजार रुपये निधीची प्रस्ताव सादर केला. 

मेदनकल्लूर (ता. देगलूर) येथील महिला बचत गटांच्या पुदिना शेतीसाठी शीत वाहन आणि इतर अनुषंगिक साहित्यासाठी १३ लाख ५० हजार रुपये, धर्माबाद तालुक्यातील महिला बचत गटांसाठी मसाला गृह उद्योगसाठी  १४ लाख २२ रुपये निधी चा प्रस्ताव वैधानिक विकास महामंडळाकडे सादर केला. या वेळी जिल्हा उपनिबंधकांनी शेतकऱ्यांतर्फे उत्पादित सोयाबीनसाठी ग्रेडिंग मशीनचा १ कोटी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.

प्रस्ताव योग्य असल्याचे व आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले. महिला आर्थिक विकास महामंडळांचे जिल्हा समन्वय आधिकारी चंदनसिंग राठोड, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com