परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी जमा

परभणी :अतिवृष्टिग्रस्त पिकांसाठी मंगळवार (ता.२४) पर्यंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील १ लाख ६६ हजार ९७३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली.
70 crore deposited in farmers' accounts in Parbhani district
70 crore deposited in farmers' accounts in Parbhani district

परभणी : अतिवृष्टिग्रस्त पिकांसाठी मंगळवार (ता.२४) पर्यंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील १ लाख ६६ हजार ९७३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ५५२ गावांतील २ लाख ५२ हजार ४४१ शेतकऱ्यांच्या १ लाख ७९ हजार ४४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२२ कोटी ६७ लाख ६५ हजार रुपये निधीची मागणी केली होती. त्यानुसार ९० कोटी २० लाख ८८ हजार रुपये एवढा निधी प्राप्त झाला.

जिल्ह्यात यंदाच्या खरिप हंगामात ५ लाख २३ हजार ८०९ हेक्टरवर पेरणी झाली. ऑगस्ट महिन्यात मूग, उडदाची पिके ऐन काढणीच्या अवस्थेत असताना अतोनात नुकसान झाले. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात सततचा पाऊस तसेच ३६ मंडळात झालेली अतिवृष्टी, यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, बागायती, फळपिकांचे नुकसान झाले. १ लाख ७९ हजार ९९८  हेक्टरवरील जिरायती, बागायती, फळपीकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.

सर्वाधिक नुकसान जिरायती पिकांचे झाले. राज्य आपत्ती निवारण बलाच्या निकषानुसार पिकांसाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये, तर बागायतीसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये या प्रमाणे, वाढीव दराने शेती पीकांसाठी प्रतिहेक्टरी ३ हजार २०० रुपये, तर बागायती पिकांसाठी  ७ हजार रुपये मदत देण्यात आली, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com