कोल्हापूर जिल्ह्यातील ७० बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यातील ७० बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यातील ७० बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात पश्चिमेकडील तालुक्यात पावसाची संततधार कायम राहिली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावड्यात सर्वाधिक १३३ मिमी पावसाची नोंद झाली. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या चोवीस तासांत एक टीएमसीने वाढ झाली आहे. धरण ५० टक्के भरले आहे. कोदे जांबरे प्रकल्प ओव्हर फ्लो होऊन कोसळत आहेत. कोल्हापूरमधील राजाराम बंधारा येथे पचगंगेची पातळी ३७ फूट इतकी झाली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने नद्यांची पाणीपातळी वाढत असल्याने बंधारे व रस्ते वेगाने पाण्याखाली जात आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत ७० बंधारे पाण्याखाली होते.

पंचगंगा नदीवरील : राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात, भोगावती नदीवरील : राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे हे सहा, तुळशी नदीवरील : बीड, आरे व बाचणी हे तीन, वारणा नदीवरील : चिंचोली, तांदूळवाडी, खोची, कोडोली व शिगाव हे पाच, कासारी नदीवरील : यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, वालोली, बाजारभोगाव व करंजफेण हे सहा, कुंभी नदीवरील : कळे, वेतवडे, मांडुकली व शेणवडे, सांगशी व आसळज हे सहा, कडवी नदीवरील : शिरगाव, सवते सावर्डे, पाटणे व कोपार्डे हे चार, वेदगंगा नदीवरील : निळपण, वाघापूर, शेणगांव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली हे नऊ, हिरण्यकेशी नदीवरील : ऐनापूर, साळगाव, निलजी, खणदाळ व जरळी हे पाच, घटप्रभा नदीवरील : कानडे-सावर्डे, आडकूर, बिजूर भोगोली, हिंडगाव व पिळणी हे पाच, ताम्रपर्णी नदीवरील : चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, धोलगरवाडी, माणगाव व कोवाड हे सहा, दूधगंगा नदीवरील : दत्तवाड, सुळकुड व सिद्धनेर्ली हे तीन, आणि धामणी नदीवरील : सुळे, आंबर्डे, मासूर्ली, गवशी व पणोरे हे पाच बंधारे पाण्याखाली गेले. 

धरणात सरासरी ३० ते ३५ टक्के पाणीसाठा झाल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.गेली दोन दिवस चालू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलेला आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडत असून, नदीकाठी असलेल्या ४२४ वीज रोहित्रांचा वीजपुरवठा महावितरणला सुरक्षेच्या कारणास्तव बंद करावा लागला आहे. तर ३ हजार शेतीपंप जोडण्या बाधित झालेल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com