Agriculture News in Marathi 70% of farmers turn to insurance scheme | Agrowon

विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी फिरवली पाठ 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पीकविम्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. प्रत्येक पीकनिहाय जाचक अटी, गेल्या दोन वर्षांपासून नुकसान भरपाई मिळाली नाही.

सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पीकविम्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. प्रत्येक पीकनिहाय जाचक अटी, गेल्या दोन वर्षांपासून नुकसान भरपाई मिळालीनाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यातील बहुतांश शेती ओलिताखाली आली आहे, मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. निसर्गकोपाच्या संकटातून सावरण्यासाठी प्रधानमंत्री विमा योजनेला पसंती दिली जाते. अवेळी पावसामुळे अनेक वेळा हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असते. शेतकऱ्यांनी संबंधित पिकांचा विमा उतरल्यानंतर सरकारकडूनही काही प्रमाणात विम्याचा हिस्सा भरला जातो. पिकाचा विमा उतरल्यानंतर शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त नुकसानभरपाई तरी मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. 

गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी खरिपाच्या हंगामात बाजरी, मूग, उडीद, भुईमूग आदी पिकांसाठी, तर रब्बीच्या हंगामात ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसाठी पीक विमा भरत आहेत. फळबागासाठी डाळिंब पिकाचा विमा भरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना खरिपाचा व रब्बीचा विमाच मिळाला नाही. गतवर्षी मृग बहराचा डाळिंबासाठी विमा भरला होता. पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना एक दमडीही मिळाली नाही. 

यंदा जिल्ह्यात अवघ्या २७ हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला असून, शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. १६ हजार ८०० नियमित शेतकरी आणि फळ बागायतदार १२ हजार १७८ शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना २०१८-१९ ला पूर्वीच्या राज्य सरकारने फळबागासाठी १८५०० रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. पण बागायतदार शेतकऱ्यांना आतापर्यंत एक रुपयाही मिळाला नाही. फळबागासाठीचे पैसे दिले नाहीत, तर ते गेले कोठे याची चौकशी करण्याची मागणी शेकतऱ्यांनी केली आहे. 

* पीकविम्यासाठी- २७ हजार नोंदणी 
* फळपीक विम्यासाठी - १२ हजार १७८ नोंदणी  


इतर बातम्या
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
जागतिक बाजारपेठेत कच्च्या  साखरेच्या...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेच्या...
आखाती देशातून आले धुळीचे वादळ पुणे : आखाती देशातून वाहणारे धुळीचे वादळ...
इंडोनेशिया पामतेल  निर्यात कमी करणार पुणे ः जागतिक पातळीवर खाद्यतेलाची मागणी वाढल्याने...
कार्बन कमी करण्यासाठी  बांबू लागवड हाच...पुणे ः पृथ्वीवरील कार्बनचे वाढते प्रमाण ही गंभीर...
पतपुरवठा सोसायट्यांसाठी  शिखर बॅंकेचे...पुणे ः राज्याच्या कृषी पतपुरवठा व्यवस्थेत मोलाची...
सरकारच्या उपाययोजनांनंतरही  शेतकरी...नागपूर : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच...
आत्महत्या नियंत्रणासाठी धोरणात्मक...चंद्रपूर : शेतकऱ्यांना स्वावलंबी करुन पाठबळ...
सीड पार्कचा प्रकल्प आराखडा तयार नागपूर : दर्जेदार बियाणेनिर्मिती सोबतच बियाणे...
जैव उत्तेजक उत्पादने  नोंदणीचा घोळात...पुणे ः राज्यातील जैव उत्तेजकांच्या यादीतील...
कृषी योजनांसाठी अर्जांचा ओघ सुरुचनगर ः कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, सिंचन साधने व...
निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण  हळद...हिंगोली ः हळद निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा...
पशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी अमरावती : सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी...
काजूला हमीभाव देण्याबाबत  प्रयत्न...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील काजू...
पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या उरकल्यापुणे : गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार...
औरंगाबाद दूध संघावर एकता पॅनेलचे...औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध संघाच्या सात...