खानदेशात पूर्वहंगामी कापसाखालील ७० टक्के क्षेत्र रिकामे

खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. त्यात पूर्वहंगामी कापसाचे अतिपावसात अतोनात नुकसान झाले आहे. या कापसात हवे तसे उत्पादन येताना दिसत नाही. यामुळे या कापसाखालील क्षेत्र ऑक्टोबरपासूनच रिकामे करण्यास सुरुवात झाली.
khandesh cotton
khandesh cotton

जळगाव ः खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. त्यात पूर्वहंगामी कापसाचे अतिपावसात अतोनात नुकसान झाले आहे. या कापसात हवे तसे उत्पादन येताना दिसत नाही. यामुळे या कापसाखालील क्षेत्र ऑक्टोबरपासूनच रिकामे करण्यास सुरुवात झाली. आजघडीला सुमारे सव्वा लाख हेक्टरपैकी ७० टक्के पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र रिकामे झाले आहे. त्यात अनेक भागात मका, गहू पिकाची पेरणी झाली आहे. रब्बी पेरणीला गती आली आहे. गहू पेरणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येईल. यामुळे शेतकरी गव्हाची पेरणी करून घेत आहेत. तर काही शेतकरी अजूनही क्षेत्र रिकामे करीत असून, त्यात बाजरी, मका लागवडीचे नियोजन आहे. कापसाची स्थिती सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या पावसाने अधिक बिकट झाली आहे. वेचणी करतानाही अधिक श्रम, मजुरी खर्च लागत आहे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव अधिक आहे. बोंडे खराब झाली. वेचणी करता येत नाही. यामुळे  नोव्हेंबरच्या अखेरीस फरदड (खोडवा) कापूस पीक घेणे शेतकऱ्यांनी टाळले. क्षेत्र रिकामे करण्यास ऑक्टोबरच्या अखेरीस सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्यात सुमारे ६५ हजार हेक्टरवर पूर्वहंगामी किंवा कृत्रीम जलसाठ्यांच्या माध्यमातून मे अखेरीस व जूनमध्ये लागवड केलेल्या कापसाचे क्षेत्र होते. हे क्षेत्र रिकामे केले जात असून, शेतकरी थेट रोटाव्हेटर फिरवत आहेत. त्यात लागलीच किरकोळ मशागत करून गहू पेरणी केली जात आहे. तसेच काही शेतकरी ठिबकवर मका लागवड करीत आहेत. पूर्वहंगामी कापसाखालील १०० टक्के क्षेत्र यंदा डिसेंबरच्या सुरुवातीलाच रिकामे  होईल, असे चित्र तयार झाले आहे. प्रतिक्रिया पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती गुलाबी बोंड अळीमुळे बिकट बनली आहे. कैऱ्या, पाते, फुले प्रचंड आहेत. पण उत्पादन हवे तसे नाही. पीक वेचणी व इतर खर्च लक्षात घेता परवडत नाही. - दीपक पाटील,  शेतकरी, माचला (जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com