Agriculture news in Marathi 70 percente crop inspection complete in kadegao taluka | Agrowon

कडेगाव तालुक्यात सत्तर टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे कृषी व महसुल विभागामार्फत पंचनामे सुरू झाले आहेत. आत्तापर्यंत सत्तर टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. तर येत्या दोन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.

कडेगाव, जि. सांगली : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे कृषी व महसुल विभागामार्फत पंचनामे सुरू झाले आहेत. आत्तापर्यंत सत्तर टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. तर येत्या दोन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.

तालुक्याला गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे तालुक्यातील आले, केळी, भाजीपाला, सोयाबीन, कलिंगड, हळद, द्राक्षे आदी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी दिवसरात्र काबाडकष्ट करून व बँका, सोसायटीची कर्जे काढून आपल्या शेतातील पिके जोमात आणली. परंतु अवकाळी पावसाने हातातोंडाला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यावर आता कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. अशा रीतीने तालुक्यातील शेती आणि शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत.

परिणामी शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महसुल व कृषी विभागाला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सध्या तालुक्यात कृषी व महसुल विभागाच्या वतीने केळी, भाजीपाला, सोयाबीन, कलिंगड, हळद, द्राक्षे आदी ३२ शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी सहायक व गावकामगार तलाठी आदींच्याकडून सुरू आहे.

तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर तत्काळ याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला जाईल.
- बी. जी. कदम,
तालुका कृषी अधिकारी, कडेगाव


इतर बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
‘अटल भूजल’मध्ये जळगावातील चार तालुके जळगाव : तेरा जिल्ह्यांत एक हजार ३३९...
खासदार गोडसेंकडून कृषी योजनांच्या...नाशिक : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने...
करमाळ्यातील खडकीत बिबट्यासदृष्य...करमाळा, जि. सोलापूर : खडकी (ता. करमाळा)...
खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांचा कापूस घेऊ...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यात कापसाचे उत्पादन...
शिरपूर परिसरातील शिक्षक, मुख्याध्यापक `...शिरपूर, जि. धुळे : नववी ते बारावीचे वर्ग...
चोपडा तालुक्यात `हतनूर`चे पहिले आवर्तन...गणपूर, जि. जळगाव : हतनूर धरणातून...
नांदेड जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर हरभरा नांदेड : ‘‘यंदाचा समाधानकारक पाऊस आणि...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
हिंगोली जिल्ह्यात मर रोगामुळे तूर लागली...हिंगोली : जिल्ह्यातील अनेक भागातील फुलोरा, शेंगा...
पीकविम्यासाठी कृषी विभागाकडे संपर्क करा...नांदेड  : ‘‘ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने...
बटाटा लागवड ठरली फायदेशीरमहाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्‍यातील कळंब, लौकी,...
साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे आंदोलनसातारा  : कृषी कायद्याविरोधात पंजाब व...
अकोल्यात रब्बीसाठी २९ कोटींचे कर्जवाटपअकोला : यंदाच्या रब्बी हंगामात लागवड ६५...
रब्बीच्या हंगामात विजेचा अडसररिसोड, जि. वाशीम  : सिंचन सुविधा निर्माण...
विमा कंपन्यांनी सरसकट भरपाई द्यावी - ...यवतमाळ :  जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार २१...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
जागेअभावी संग्रामपुरात पाच दिवसांपासून...संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाकडे मका...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...