जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
धान उत्पादकांना प्रतिक्विंटल सातशे रुपये प्रोत्साहन अनुदान
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल ७०० रुपये देण्यास मंगळवारी (ता.२४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबई: आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल ७०० रुपये देण्यास मंगळवारी (ता.२४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे १४०० कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च येईल.
खरीप हंगाम २०२०-२१ साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण धानासाठी प्रति क्विंटल १८६८ रुपये व ग्रेड धानासाठी १८८८ रुपये निश्चित केली आहे. मात्र धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ ऑनलाइन खरेदी होणाऱ्या धानासाठीच ही राशी मिळेल. या वर्षी १ कोटी ७८ लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल.