Agriculture news in Marathi 70,000 quintals of soybean arrives in Latur | Agrowon

लातूरात सोयाबीनची ७० हजार क्विंटल आवक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

दिवाळीचा सण येत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन लातूरच्या अडत बाजारात आणत आहेत. दररोज ७० हजार क्विंटल सोयाबीनची आवक असून, त्या पैकी ५० हजार क्विंटल सोयाबीनचे माप करून खरेदी केली जात आहे. दररोज सोयाबीनच्या गाड्याच्या रांगा लागत आहेत.

लातूर ः जिल्ह्यात या वर्षी जूनपासूनच पाऊस राहिल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात काही भागात परतीच्या पावसाने झटका दिला असला तरी ते क्षेत्र जिल्ह्याच्या तुलनेने कमी आहे. त्यात आता दिवाळीचा सण येत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन लातूरच्या अडत बाजारात आणत आहेत. दररोज ७० हजार क्विंटल सोयाबीनची आवक असून, त्या पैकी ५० हजार क्विंटल सोयाबीनचे माप करून खरेदी केली जात आहे. दररोज सोयाबीनच्या गाड्याच्या रांगा लागत आहेत.

या हंगामात अनेक संकटांचा सामना करीत शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीन आले आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाचा काही भागांत फटका बसला आहे. पाऊस चांगला राहिल्याने पण सरासरी उताराही चांगला राहिला आहे. नगदी पीक म्हणूनच शेतकरी सोयाबीनकडे पाहत आहेत. त्यात  आता दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्यामुळे शेतकरी आपले सोयाबीन अडत बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. दररोज ७० हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. यापैकी ५० हजार क्विंटलचे माप करून त्याचे पैसेही दिले जात आहेत.

हमीपेक्षा जास्त भाव
अडत बाजारात सोयाबीनची आवक वाढत चालली आहे. तरी देखील भाव चांगला आहे. आठ दहा दिवसांत पाचशे रुपयांपेक्षा अधिक भाव वाढला आहे. सोयाबीनचा हमीभाव तीन हजार ८८० रुपये प्रति क्विंटल आहे. तर येथील अडत बाजारात सोयाबीनला सरासरी चार हजार रुपयांपर्यंत भाव गेला आहे. त्यामुळे शेतकरी बाजारात सोयाबीन घेऊन येताना दिसत आहे.

जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा दीडपटीने वाढला आहे. यात नैसर्गिक संकटामुळे वीस टक्के नुकसान धरले तरी सव्वा पटीने अधिक सोयाबीन बाजारात येणे अपेक्षित आहे. सध्या दररोज ७० हजार क्विंटल आवक आहे. ५० हजार क्विंटलचे माप होत आहे. सायंकाळी आलेल्या सोयाबीनचे दुसऱ्या दिवशी माप केले जाते. आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे. भावही सध्या चांगला आहे.
- ललितभाई शहा, सभापती, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...