agriculture news in marathi 72% sowing of rabbi in Pune division | Agrowon

पुणे विभागात रब्बीची ७२ टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जानेवारी 2021

पुणे विभागात आत्तापर्यंत १४ लाख ४९ हजार सात हेक्टरपैकी दहा लाख ४० हजार ४३८ हेक्टर म्हणजेच ७२ टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे ः परतीच्या उशिराने झालेल्या पावसाचा परिणाम रब्बीच्या पेरण्यांवर झाला आहे. यामुळे रब्बीच्या पेरण्या चांगल्याच खोळंबल्या होत्या. उशिराने काही प्रमाणात वाफसा झाला. त्यामुळे रब्बीच्या बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत १४ लाख ४९ हजार सात हेक्टरपैकी दहा लाख ४० हजार ४३८ हेक्टर म्हणजेच ७२ टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे रब्बी पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांचा होता. रब्बीच्या पेरणीस ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा कालावधी चांगल्या असतो. मात्र, उशिराने झालेल्या पावसामुळे पुरेसा वाफसा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरवात केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर ज्वारी निसवण्याच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी ज्वारीवर चिकटा रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

विभागात रब्बी हंगामातील ज्वारी पिके कणसामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. थंडीमुळे गहू पिकास पोषक वातावरण आहे. पीक वाढीच्या ते निसवण्याच्या अवस्थेत आहे. पिकांवर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. 

हरभरा पीक घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. तर काही ठिकाणी पिकांवर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मका पीक फुलोरा अवस्थेत असून त्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. तर करडई पिकांची उगवण चांगली आहे. काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सूर्यफूल पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सुरू हंगामातील ऊस लागवडीची कामे सुरू आहे. त्यामुळे ऊस लागवडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. रब्बी कांदा पिकांची लागवड सुरू आहे.   


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...